जुन्या काळी लोक मातीची चूल बनवून त्यावर जेवण शिजवत असतं. सगळं काही चुलीवर व्हायचं त्यानंतर हळू हळू लोकांच्या घरी रॉकेलचा स्टोव्ह आला आणि यामुळे स्वयंपाकाचे काम थोड हलकं व्हायला लागले होते. पण आताची परिस्थिती अशी आहे की या स्टोव्हची जागा ही गॅस शेगडी ने घेतली आहे. एका बटणावर पेटणारी शेगडी आणि पटापट अन्न शिजले जाते. त्यामुळे स्त्रियांच्या तर गॅस अगदी जवळचा मित्र झाला आहे. शिवाय आवाज नाही रॉकेलचा वास नाही. त्यामुळे गॅस वर जेवण बनवणे स्त्रियांना अधिक सहज आणि सोपे झाले आहे.
शिवाय आता शिधापत्रिकेवर रॉकेल मिळणे ही बंद झालेले आहे आणि ब्लॅक ने मिळणे महाग रॉकेल परवडणारे नाही. त्यामुळे स्टोव्हची जागा ही आता गॅस ने घेतली आहे. त्यामुळे जुन्या काळी विकला जाणारा स्टोव्ह हा आता हवी तशी मागणी नसल्यामुळे याचे उत्पादनच बंद करण्यात आले आहे. म्हणजेच काय झाले तर आपल्या सारख्या सर्वसामान्यांच्या घरातला स्टोव्ह हा इतिहास जमा झाला आहे हे म्हणण्यास हरकत नाही.
पूर्वीच्या काळी चुलीवर किंवा स्टोववर स्वयंपाक केला जायचा तर पाणी तपावण्यासाठी बंब असायचे. तर लाईट गेल्यावर कंदील आणि बत्ती असायची पण या सर्वाची जागा गॅस, गिझर, चार्जिंगच्या बॅटरी यांनी घेतली आहे. श्रीमंतांच्या घरी व मोठ्या हॉटेलांत दिसणारी गॅस शेगडी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली. तेव्हापासूनच स्टोव्ह बाजूला गेले. सर्वसामान्यांच्या घरांमध्ये गॅस शेगडी पोचली आहे मात्र, सिलिंडरचे दर गरिबांच्या आवाक्यात नसल्याने रॉकेलच्या स्टोव्हचा वापर आजही थोड्या प्रमाणात होत आहे.
स्टोव्हचा वापर आता नसल्यागत झाल्याने याचे उत्पादन करणारे कामगार ही अट बेरोजगार झाले आहेत. तसेच स्टोव्ह ची विक्री बंद झाल्यामुळे स्टोव्ह दुरुस्तीच्या व्यवसायावर गंडांतर आले याचा फटका स्टोव्ह दुरुस्ती करणाऱ्यांवर बसला आहे. मित्रानो असे आहे की काळानुसार जरी काही वस्तू बदलल्या असल्या तरी याच्यामुळे त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या लोकांना याचा फटका बसतो.