Home संग्रह आपण रोज पुजा करताना देवाला कुंकू वापरतो पण हा बनवतात कसा माहीत आहे

आपण रोज पुजा करताना देवाला कुंकू वापरतो पण हा बनवतात कसा माहीत आहे

by Patiljee
7401 views

आपल्या घरात देवाची पूजा करताना आपण नेहमीच कुंकवाची बोटे देवाच्या फोटोला लावतो, तसेच कुंकू हे सुवासिनीने सुवासिनीला लावायचे असते. कुंकू सौभाग्याच लेण आहे. लग्नप्रसंगी कित्येक जातीत वधू-वराच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरतात. पण हा कुंकू कसा बनवतात तुम्हाला माहीत आहे का? यासाठी त्याचाच जोडीदार म्हणजे हळदीचा उपयोग करतात आणि हा कुंकू बनवतात. कुंकू बनवण्याची पद्धत तशी पाहायला गेली तर खूप सोपी आहे पहिल्यांदा ही पद्धत गावोगावी केली जात होती.

हे कुंकू बनवण्यासाठी हळद आणि पापडखार जो पापड बनवण्यासाठी वापरतात त्याचा उपयोग केला जातो, या दोघांच्या मिश्रणातून कुंकू तयार होते. पुर्वी ही हळद पहिल्यांदा व्यवस्थित वालवली जायची आणि त्यानंतर दगडाच्या जात्यावर दळली जायची. त्यानंतर त्यात पापड खार मिसळून हे मिश्रण उन्हात वाळवून कुंकू बनवायचे. तुम्ही कधी कधी बाजारातून कुंकू आणता पण ते कुंकू कपाळावर लावल्याने कधी कधी तुम्हाला अलर्जी होते. या अलर्जी पासून वाचण्यासाठी तुम्ही हा कुंकू घरी ही बनवू शकता ज्यामुळे तुमच्या त्वचेचा त्रास होणार नाही.

याप्रकारे ही कुंकू केला जातो. त्यासाठी लागणारे साहित्य असे घ्या १ किलो साबुत म्हणजे अख्खी हळद, त्या हळदीची पावडर बनवून घ्या, तुम्ही चांगल्या हळद पावडचा उपयोग ही करु शकता. ४० ग्राम तुरटी, १२० ग्राम पापड खार, २०-२५ थेंब लिंबूचा रस आणि २ चमचे तिळाचे तेल यापासून बनवलेले कुंकू याने तुमच्या त्वचेला अपाय होत नाही.

हळद बेकिंग सोडा आणि लिंबाचे थेंब एकत्र करून मिश्रण बनवा आणि हे मिश्रण सुकवा यापासून बनलेले कुंकू ही उत्तम असते.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल