Home विचार तुमच्या जिवलग व्यक्तींसोबत भांडणे झाली आहेत, बोलायची इच्छा असून पण बोलता येत नाही

तुमच्या जिवलग व्यक्तींसोबत भांडणे झाली आहेत, बोलायची इच्छा असून पण बोलता येत नाही

by Patiljee
434 views

मित्रांनों या जगात माणसाला अनेक नात्यांनी बांधलेले आहे, कारण समाजात तो एकटा राहू शकत नाही त्याला सगळ्यांशी मिळून मिसळून राहणे हे त्याच्या हिताचे आहे. यासाठी त्याला अनेक नाती मग ती रक्ताची असो किंवा मानलेली असो बांधून ठेवायला हवीत. थोड जरी काही झालं की अशी नाती तुटताना वेळ लागत नाही, मग ते नात नवरा बायकोच असो किंवा सासू सूनेच असो किंवा भावा बहिणीच असो किंवा मित्राचे असो प्रत्येक नात्याला आपल्या आयुष्यात महत्व द्यायला हवं.

नात हे कोणतेही असो त्या समोरच्या व्यक्तीवर नेहमी विश्वास ठेवायला शिका. एखाद्या वेळेस त्या समोरच्या व्यक्तीकडून आपल्या बाबतीत काही चुका घडतात त्यामुळे तुम्ही खूप दुखी होता आणि हे खरं आहे कारण जवळच्या व्यक्तीने जेव्हा आपल्याला अशा प्रकारचा त्रास दिलेला असतो त्यावरून तुम्ही ढासळून जाता. कारण तुमच्या त्या व्यक्तीवर संपूर्ण विश्वास असतो. तो कधी तुमच्या बाबतीत असे करणार नाही पण नेमकी तीच व्यक्ती तुमच्या बाबतीत काही चुकीचे करते आणि त्यांच्यावरील तुमचा विश्वास कमी होतो. आणि तुमच्यात भांडणे होतात.

आता एक गोष्ट आयुष्यभर त्या व्यक्तीने तुम्हाला साथ दिलेली असते तुमच्या सुखात आणि दुःखात ही तुमच्या सोबत नेहमीच राहिलेला हा व्यक्ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आवडलेला आहे. पण फक्त एक गोष्ट जी तुमच्या मनाविरुद्ध जाऊन केली आहे त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीवर नाराज होता तर ही गोष्ट तुम्ही चुकीची करता. जर ती व्यक्ती सर्व गोष्टींमधे उत्तम आहे, आणि फक्त एकच गोष्ट ही तिने वाईट केली आहे म्हणजे तुम्हाला विचारून केली नाही तर त्यामुळे तुमचा त्याच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. प्रत्येक वेळी आपण त्याच्याकडून अपेक्षा करणेच सोडू द्या ना जेव्हा आपण एखाद्या कडून हद्दीपेक्षा जास्त अपेक्षा करतो तिथेच आपण फसतो. म्हणून अपेक्षा करणे सोडा म्हणजे तुम्हाला दुःख होणार नाही.

ती व्यक्ती जर इतर गोष्टी मध्ये चांगली असेल आणि एकच अशी गोष्ट आहे जी आपल्याला सांगितली नाही तर या एका गोष्टीने ती व्यक्ती कोणी तुमचा शत्रू आहे असे समजू नका आणि त्याच्यासोबत आपले नाते पहिल्यासारखे कायम ठेवा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल