Home कथा क्षणिक सुख

क्षणिक सुख

by Patiljee
184299 views

हॅलो सोनल कुठे आहेस अजुन तू? कधीचा येऊन थांबलोय मी इथे? अक्कल आहे का नाही तुला? एवढ्या उन्हात वाट पाहायला लावतेस मला? (महेशचा पारा आज जास्तच चढला होता) अरे हो महेश आलेच मी घरात बाबा होते ना, म्हणून निघता आले नाही. हे बघ मागे वळून तुझ्या समोर उभी आहे. तिला पाहताच त्याचा चढलेला पारा शांत झाला आणि जाऊन तिला घट्ट मिठी मारली. काय ग अशी तू? किती आज वाट पाहायला लावलीस, चल बस गाडीवर आपण जातोय आज कुठेतरी? काय रे कुठे नेतोस मला? अग बस तर सांगतो मग.

त्याने तिला गाडीवर बसवून मित्राच्या फ्लॅटवर आणली. काय रे महेश कुणाचे घर आहे हे? घरात तर कुणीच दिसत नाही. अग कुणीच नाही घरात म्हणून तर आणले आहे तुला. मित्राचे घर आहे. आपल्याला प्रायव्हसी पाहिजे होती म्हणून तर मित्राला मस्का मारला आणि घराची चावी त्याच्याकडून घेतली. एवढे बोलून त्याने जोरात तिला स्वतःकडे ओढली आणि तिच्या ओठांचा दीर्घ चुंबन घेतला. ती लाजली, त्याला ढकलून बेडवर जाऊन बसली.

दोघांमध्ये इशाऱ्याने बोलणे होत होते. बेडरूम मध्ये त्या शांततेत सुद्धा ते दोघं खूप काही मनातून बोलत होते. असे नव्हते की अशी वेळ त्यांच्यात कधी आली नव्हती. ह्या आधी सुद्धा त्यांनी खूप वेळा रोमान्स केला होता पण एक लिमिट राखून. पण आज गोष्ट थोडी वेगळी होती. त्याने तिच्या जवळ जाऊन तिला बाहुपाशात घेतलं. तिचे कपडे काढायला सुरुवात केली. तिने त्याला त्याला थांबवले.

नाही महेश माझ्यानी हे नाही होणार. आपण हे चुकीचे करतोय. हे सर्व आपण लग्न झाल्यावर करू शकतो. अग सोनल लग्न झाल्यावर असे काय म्हणतेस लग्न झाले आहे आपले असेच समज. आपल्या मनातून आपण एकमेकांना नवरा बायको मानले आहे. घाबरु नकोस मी नेहमी तुझ्या सोबत आहे. शेवटी नाही नाही म्हणता म्हणता दोघांमध्ये प्रेमाचा प्रणय रंगला आणि नको ते होऊन बसले.

ते क्षणिक अनुभवलेले सुख दोघानाही खूप आवडलं होतं. दोघेही त्या क्षणात पार रमून गेले. काही दिवसांनी सोनलचा रिझल्ट लागला. ती पदवीधर झाली होती. गावात कॉमर्स मधून ती पहिली आली होती. तिच्या बाबांना तर एवढा आनंद कधीच झाला नव्हता. हत्तीवरून पेढे वाटायचे फक्त बाकी होते. ती महेशला फोन करत होती पण त्याचा फोन बंद लागत होता. कुठे गायब झाला होता ते तिलाही माहीत नव्हते.

एवढ्यात तिला तिच्या ताईचा फोन आला. सोनल कुठे आहेस तू? काय करून बसलीस तू हे? बाबांनी हेच संस्कार केले आहेत का तुझ्यावर? अग हो हो ताई काय झालं सांगशील का मला एकदा? आधी शेन खालेस आणि आता विचार काय झालं? तुझा एमएमएस आलाय महेश सोबत रासलीला केल्याचा ह्यांच्या मोबाईलवर, तुला आम्ही सभ्य मानत होतो ग खूप, बाबा तर नेहमी म्हणायचे माझी सोनल माझे नाव काढणार, पण हे असे पांग फेडलेस का बापाचे?

हे सर्व ऐकुन सोनलच्या पायाखालची जमीनच सरकली होती. काही वेळातच तिच्या मैत्रिणीने सुद्धा तो व्हिडिओ तिला पाठवला. ज्या दिवशी मित्राच्या घरी महेश घेऊन गेला होता त्याच दिवशीचा व्हिडिओ होता. माझे काय होणार? लोक माझ्याकडे कोणत्या नजरेने पाहणार? माझ्या वडिलांची काय इज्जत राहणार? अशा असंख्य प्रश्नांनी सोनलचे डोकं भंडावून सोडले. आपण केलेल्या चुकीचा तिला पच्छाताप होत होता. पण आता वेळ निघून गेली होती. तिला पुढे फक्त आणि फक्त आंधर दिसत होता. घरात जाऊन तिने पुढचा मागचा विचार न करता पंख्याला दोरखंड लाऊन गळफास घेतला.

ह्या कथा पण वाचा

समाप्त

कसे आहे ना मित्रानो तो एमएमएस कुणी काढला? कुणी वायरल केला? ह्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपण त्या गोष्टी मध्ये पडलोच का ह्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे? प्रेमात सुख उपभोगणे हे चांगलेच आहे ह्यात काही शंका नाही पण त्याला एक मर्यादा हवी. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर मनापासून प्रेम करत आहात तर नक्कीच ह्या गोष्टी लग्नानंतर सुद्धा घडू शकतात. फक्त तुमच्या मनावर तुमचा ताबा असावा. नात्याची मजा गोष्टी उलगडण्यात असते. आपण जाणीपूर्वक गोष्टी बिघडवून ठेवतो.

तुम्हाला जर होरर कथा आवडत असतील तर तुमच्यासाठी आम्ही नवीन साईट तयार केली आहे. एकदा आवश्य भेट द्या.

लेखक : पाटीलजी

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल