पेन किलर घेणे ही आताच्या काळातील सर्वात सोपी पद्धत होय. कोणत्याही प्रकारचं दुखणं तुमच्या शरीरामध्ये असो एक पेन किलर गोळी घेतली की आपल्याला लगेच बरे वाटते. हा जो आपल्याला भ्रम पडलेला असतो तोच संपूर्ण चुकीचा आहे. या फास्ट फॉरवर्डच्या जगात कोणालाही जास्त आराम करण्यासाठी वेळ नसतो आणि लवकरात लवकर कसे बरे वाटेल याकडे सर्वांचा कल असतो आणि आपण पैन किलर चां मारा आपल्या शरीरावर करत असतो. काही लोकांना तर याची सवयच लागून जाते आणि पेन किलर घेतल्याशिवाय त्यांना बरे ही वाटतं नाही
अजुन एक म्हणजे पेनकिलर खाल्याने आपल्याला तात्पुरता बरे वाटते आणि पुन्हा काही वेळाने आपले दुखणे पुन्हा चालू होते आणि म्हणून पेन किलर ने आपल्याला तात्पुरते जरी बरे वाटत असले तरी त्या घेतल्याने आपल्या शरीराला आतून खूप हानी होत असते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
सतत पेन किलर घेतल्याने त्याचा परिणाम आपल्या लिव्हर वर होत असतो. त्यामुळे पोटातली पेशी फुटतात. शिवाय काही मेडिसिनवर असे ही लिहलेले असते ओव्हर डोस झाल्यामुळे त्याचा त्रास तुमच्या लिव्हरला होऊ शकतो. शिवाय जेव्हा तुम्ही काही खाल्लेले नसेल तेव्हा गोळी कधीच घेऊ नका. त्यामुळे तुमच्या किडनीवर त्याचा जास्त परिणाम होतो.
या गोळ्यांचे जास्त सेवन केल्याने फुफ्फुसाची समस्या उद्भवू शकते. शिवाय दम्याचा त्रास देखील होऊ शकतो. यापुढे जाऊन हाय बीपी, थायरॉईडसारख्या समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं.
जास्त प्रमाणात पेन किलर घेतल्याने त्याचा परिणाम पोटावर होतो. पोटात गॅस निर्माण होतो, जळजळ, उलटी येणे ढेकर येणे इत्यादी समस्या निर्माण होतात त्यानंतर हळू हळू पोटात सूज येते.
जेव्हा तुम्हाला सर्दी होऊन डोके दुःखी आणि इतर त्रास होत असतो तेव्हा गरम गरम सूप प्या, आराम करा आणि भरपूर फळे खा त्यामुळे तुम्हाला बरे वाटेल.
तुम्हाला जास्त दुखण्याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य ती पेन किलर देतात आणि त्याचबरोबर एसिडीटीची गोळी ही देतात. त्यामुळे पेन किलरच्या गोलीची कोणतीही रिएक्शन तुम्हाला होत नाही.
जेव्हा शरीराच्या कोणत्याही भागात दुखत असेल तेव्हा एका भांड्यात पाणी घेऊन त्यात ऍपल व्हिनेगर 2 कप टाका आणि जो भाग दुखतोय तो पाण्यात ठेवा थोड्या वेळात तुमचे दुखणे कमी होईल.
जेव्हा तुमचे संपूर्ण शरीर आतून दुखत असेल तेव्हा गरम दुधात हळद मिसळा आणि प्या तसेच बाहेरील घाव असेल तरी हळदीची पेस्ट करून लावा नक्की आराम मिळेल.