कोथिंबीर ही आपण सर्वच भाज्यांमध्ये वापरत असतो. कारण तिचा वास आणि चव काही वेगळाच असतो. कोणत्याही पदार्थावर वरून कोथिंबीर कापून भूर्भुरली की त्या पदार्थ कसे व्यक्तीचा बघण्याचा दृष्टीकोन ही बदलतो. बघताक्षणी खावासा वाटतो मग ती कोथिंबीरची वडी असो किंवा भजी, तोंडाला पाणी आणल्याशिवाय राहत नाही. अशी ही कोथिंबीर कधी खूप महाग होते तर कधी स्वस्त आणि कधी कधी आपल्याला बाजारात ही मिळत नाही. अशा वेळी आपण काय करायचे तर एक गोष्ट करून ठेऊ शकतो ती म्हणजे कोथिंबीर सुकवून ठेवावी.
एकतर तुम्ही जेव्हा बाजारात स्वस्त अशी कोथिंबीर गड्डी मिळेल तेव्हा ती आणून त्याची खालची मूळ काढून ती अगोदर धुवून घ्या आणि मग चाळणी मध्ये निथळत ठेवा. पूर्ण कोरडी झाल्यावर एक पेपर बॅग घेऊन त्यात ही कोथिंबीर ठेवा आणि त्या बॅगेला छोटे छोटे होल करा आणि ज्या ठिकाणी प्रत्यक्ष उन पडत नसेल अशा ठिकाणी सुकत ठेवा 2 ते 3 दिवसात ही कोथिंबीर सुकल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्या.
आपण मायक्रोव्हेव मध्ये नेहमी अन्न शिजवत असतो पण आज आपण कोथिंबीरची पावडर बनवायला शिकूया. पाहिले सांगितल्याप्रमाणे कोथिंबीर धुवून आणि सुकवून घ्या त्यानंतर देठ काढून मी मायक्रोव्हेव मध्ये 2 ते 3 मिनिट ठेवा. त्यानंतर पुन्हा कोथिंबीर पलटी करून पुन्हा 2 ते 3 मिनिट ठेवा कोथिंबीर सुकून जाईल मग तुम्ही मिक्सर मध्ये वाटून घ्या.
तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारच्या घरघुती किचनमधील गोष्टी आमच्यासोबत शेअर करायच्या असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.