Home हेल्थ गाईचे दूध आणि म्हशीचे दूध या दोघांमधील कोणतं दूध आपल्या शरीराची उत्तम आहे?

गाईचे दूध आणि म्हशीचे दूध या दोघांमधील कोणतं दूध आपल्या शरीराची उत्तम आहे?

by Patiljee
639 views

दूध पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे काही लोक आपले शरीर स्वस्थ उत्तम राहण्यासाठी सकाळची सुरुवात ही दूध पिण्याने करतात. दुधात असणारे कॅल्शिअम तुमची हाड मजबूत करते तर प्रोटीन तुमच्या मांसपेशी मजबूत करून तुमच्या शरीरात प्रतिरोधक क्षमता वाढवते. म्हणून सकाळी दूध पिणे हे तुमच्या शरीरासाठी उत्तम टॉनिक आहे. पण कोणते दूध तुम्ही पिता गाईचे की म्हशीचे या दोघांतील अंतर काय आहे हे आज आपण पाहूया.

गाईचे दूध हे पातळ असते शिवाय पचायला ही ते हलके असते तर म्हशीचे दूध हे जड असते. त्यामुळे पचायला ही खूप जड असते. विदेशात गाईचे दूध हे जास्त प्रमाणत वापरले जाते शिवाय भारत आणि चीन या राष्ट्रांमध्ये म्हशीचे दूध जास्त प्रमाणत वापरले जाते. गाईचे दूध पचायला हलके असते त्यामुळे आपल्या लहान मुलांसाठी हेच उत्तम आहे. कारण लहान मुलांची पचनसंस्था इतकीही मजबूत झालेली नसते त्यामुळे त्यांना हलके असणारे गाईचे दूध उत्तम.

पण म्हशीचे दूध हे शरीरातील ताकद वाढण्याबरोबरच स्नायूंची ताकदही वाढवते गायीच्या दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण ३ टक्के असते तर म्हशीच्या दुधात ते ४ टक्के असते. त्याचप्रमाणे म्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. ज्या लोकांची पचनसंस्था कमजोर आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचे आहे अशा लोकांनी गाईचे दूध आहारात घेणे उत्तम.

तसे पाहिले तर दोन्ही प्रकारचे दूध हे आपल्या शरीरातील उत्तम आहे पण प्रत्येक शरीराची ठेवण आणि त्यांच्यातील विकार यांच्या बदलामुळे प्रत्येकाने ठरवावे आपल्याला कोणते दूध चांगलं आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल