Home संग्रह कोल्हापूरला फिरायला जाणार आहात का? मग बघा फिरण्यासाठी कोणकोणती ठिकाणे आहेत

कोल्हापूरला फिरायला जाणार आहात का? मग बघा फिरण्यासाठी कोणकोणती ठिकाणे आहेत

by Patiljee
775 views

कोल्हापूर हा महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक आणि धार्मिक अशा स्थळांनी भरलेला शहर आहे. विविधतेने नटलेले इथलं पर्यटन वैभव देशभरातील पर्यटकांना खुणावतं. या कोल्हापूरचे जसे महालक्ष्मी चे स्थान महत्वपूर्ण आहे त्याचप्रमाणे श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, शिलाहार राजांच्या कालखंडातील प्राचीन खिद्रापूर मंदिरासह अन्य पर्यटनस्थळे म्हणजे धार्मिक पर्यटनाचा गोफच. छत्रपती राजर्षी शाहूंची नगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर, कुस्तीपंढरी, गुळाची 0 बाजारपेठ, जगप्रसिद्ध कोल्हापूरी चप्पल, रंकाळा तलाव, आणि तांबडा-पांढरा रस्सा चाखायचा असेल तर कोल्हापुरला पर्यटकांनी नक्की भेट द्यायला हवी या तर मित्रानो कोहापुर मध्ये पाहण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत त्यातील आपण काही ठिकाणं पाहणार आहोत.

महालक्ष्मी अंबा मातेचे मंदिर
108 पीठांपैकी एक असणारे मंदिर देवी अंबा मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध देवस्थान आहे. त्याचप्रमाणे महाष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी हे एक आहे. दर्शनासाठी मोठी रांग लागते त्यानंतर देवीचे जवळून दर्शन आपल्याला घडते. कोल्हापूरला जाणे आणि महालक्ष्मी देवीचे दर्शन न घेणे हे होऊच शकत नाही. येथे कोरीव काम केलेली मंदिरे बघण्यासारखी आहेत.

छत्रपती शाहू महाराज यांचा राजमहाल
महालाची सजावट वैशिष्ठ पूर्ण आहे तर याच्यावर ब्रिटिश वास्तुकलेचा पगडा दिसून येतो. याच ठिकाणी एक देवीचे मंदिर ही आहे या राजमहालात शाहू महाराजांचा एक पुतळा आहे तर त्यांनी पूर्वीच्या काळी शिकार केलेले बहुतेक प्राणी हे भुसा भरलेले त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील.

पन्हाळा गड
कोल्हापूरची पहिली राजधानी म्हणून हा पन्हाळा ओळखला जातो. या ठिकाणी जाण्यासाठी कोल्हापूर पासून सुमारे 20 किलोमिटर अंतर कापावे लागते. ऐतिहासिक दृष्टीने खूप महत्त्वाचा असणारा हा किल्ला या किल्ल्यात असताना सिद्धी जोहार याने किल्ल्याला वेढा दिला होता तेव्हा शिवाजी महाराज मोठ्या हुशारीने यातून निसटले होते. बाजीप्रभू यांनी स्वतच्या बलिदानाने शिवाजी महाराजांची सुटका केली होती.

जोतिबा मंदिर
कोल्हापूर शहरापासून सुमारे 14 किलोमिटर अंतरावर ज्योतिबा देवाचे देवस्थान आहे. हे मंदिर म्हणजे केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंग या तीन मंदिरांचा समूह आहे. या ज्योतिबाच्या यात्रेत 50 हून जास्त सासन काठ्या असतात ढोल ताशांच्या तालावर येथे येणारे भक्त हे या काठ्या घेऊन नाचत असतात जोतिबाच्या नावानं चांग भल असा गरज करतात.

रामलिंग धुळोबा
कोल्हापुरपासून १५ किलोमीटरच्या अंतरावर हातकणंगले जवळ रामलिंग आणि धुळोबी ही देवस्थाने आहेत. रामलिंग मंदिर ही एक कोरीव गुंफा असून पुरातन देवस्थान आहे. आतील बाजूस शिवलिंग व गणपती ची मूर्ती आहे. देवालयाच्या बाहेरील बाजूस हेमाडपंथी शिल्प आहे. कन्नड भाषेतील शिलालेख असून थोड्या अंतरावर धुळोबा देवस्थान आहे.

रंकाळा तलाव
या तलावाजवळ रंक महा भैरव या श्री महालक्ष्मी देवीच्या रक्षकाचे मंदिर आहे. त्याच्या नावावरूनच या तलावाला रंकाळा हे नाव पडले आहे त्याचप्रमाणे येथे बोटीने फिरण्याची सोय आहे या तळ्या मध्ये संध्या हे मठ आहे याची बांधणी हेमाड पद्धतीने केलेली आहे.

जुना राजमहाल
काळया दगडां पासून बांधलेली ही इमारत पाहून कुणीही प्रभावित होणार नाही हे शक्य नाही. राजाराम हे हायस्कूल आहे त्यातच ही शाळा ही आहे. तर या महानगर पालिकेच्या इमारतीचा थाट जणू राजेशाही आहे.

न्यू पॅलेस
न्यू पॅलेस या ठिकाणी एक संग्रहालय आहे यात जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी 35 रुपये तिकीट आहे. या राजवाड्याचे बांधकाम 1884 साली पूर्ण करण्यात आले. या राजवाड्यात प्रशस्त असा राजदरबार आहे. या राजवाड्याच्या आवारात मोर, हरीण असे वेगवेगळे प्राणी तुम्हाला पाहायला मिळतील.

विशाळगड, पारगड
कोल्हापुर शहरापासून पासून ९० किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. शाहूवाडी तालुक्यात हा किल्ला आहे चार दरवाजा, तळे, वृंदावने, टकमक कडा, रामचंद्र निळकंठ यांचा जुना राजवाडा, हजरत रेहान मलिक दर्गाह, पाताळनगरी आदी या ठिकाणी पाहण्यासाठी प्रेक्षणीय आहेत. निसर्गाची उधळण असलेला पारगडा किल्ला चंदगड ते तिलारी मार्गावर आहे.

कणेरी मठ
कोल्हापूर शहरापासून याची लांबी सुमारे 12 किलोमिटर इतकी आहे. या ठिकाणी एक प्राचीन शिवमंदिर आहे त्याच प्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवण्यात आलेल्या खूप सुंदर अशा मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील. कोल्हापूरमधील ग्रामीण भागातील जीवन अत्यंत चांगल्या प्रकारे इथे रेखाटले आहे.

टाऊन हॉल म्युझियम
कोल्हापूर शहरात नवगॉथिक वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना असलेले टाऊन हॉल हे वस्तूसंग्रहालय आहे. या ठिकाणी सातवाहनकालिन अनेक वस्तू आहेत. ग्रीक देवता, योद्धे, जुनी शस्त्रास्त्रे, दुर्मिळ शिल्पाकृती, चंदन आणि हस्तीदंताच्या कोरीव कलाकृती आहेत . बोटॅनिकल गार्डन, अनेक दुर्मिळ वृक्ष येथे आहेत.

बिन खांबी गणेश मंदिर
कोल्हापुरात पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची पावले आपोआप या बिन खांबि गणेश मंदिराकडे वळतात या मंदिराला एकही खांब नाही म्हणून याला बिन खांबी गणेश मंदिर असे म्हणतात.

पंचगंगा नदी
पंचगंगा ही नदी पाच नद्यांपासून बनलेली आहे पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते शिवाय हिचे उगम स्थान ही कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

मित्रानो तुम्ही जर कोल्हापूरमध्ये फिरण्यासाठी प्लॅन करत आहात तर ह्या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल