संजय दत्त ह्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची आणि त्याच्या करीयरला वर आणणारी कोणती फिल्म असेल तर खलनायक आहे. सुभाष घई ह्यांच्या दिग्दर्शनात बनलेली ही फिल्म त्या वेळी तुफान लोकप्रिय झाली होती. ह्या सिनेमात माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ ह्यांच्या मुख्य भूमिका होत्या.
६ ऑगस्ट १९९३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ह्या सिनेमाचे लेखन राम केळकर आणि कमलेश पांडे ह्यांनी केलं होतं. तर सिनेमाचे संगीत लोकप्रिय संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्यांनी केलं होतं. १९९३ मध्ये सर्वात जास्त कमाई करणारी दुसऱ्या नंबरची फिल्म सुद्धा ठरली होती. सुभाष घई ह्यांच्या आयुष्यातील हा चित्रपट खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच त्यांनी ह्या सिनेमाच्या सिक्वेलवर काम करायला सुरुवात केली आहे.
ह्या संदर्भात अधिक बोलताना त्यांनी खलनायक सिनेमाच्या कास्टींग बद्दल म्हंटले की खलनायक सिनेमात बल्लू म्हणजेच संजय दत्तच्या भूमिकेत आधी नाना पाटेकर ह्यांना विचारण्यात आले होते पण त्यांच्या डेट्स न मिळाल्याने हा सिनेमा संजय दत्त ह्याच्या झोळीत पडला. पण पुढे जाऊन ह्या सिनेमाने इतिहास रचला. गावागावात पडद्यावर हा सिनेमा लोक आवर्जून लावत.
खलनायक २ सिनेमाचे कथानक खलनायक सिनेमाच्या पुढे असेल. तीच कथा पुढे सरकताना आपल्याला दिसेल. पण ह्या सिनेमात कोण स्टार कास्ट असणार हे अजुन सांगण्यात आले नाहीये. तुमच्या मते कोणता कलाकार ह्या सिनेमात शोभून दिसेल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.