कोंडा होणे म्हणजे नेमके काय तर तुमच्या डोक्यावर केसांच्या भागात पांढऱ्या रंगाच्या कोरड्या त्वचेचे थर बनतात. ही समस्या स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये आढळते, यासाठी तुम्ही त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. ही समस्या जास्त करून हिवाळ्यामध्ये उद्भवते हा कोंडा झाल्यावर डोक्यात सतत खाज येते खांद्यावर कपड्यांवर कोंडा पडलेला दिसणे यामुळे कधी कधी आपल्याला लाजिरवाणे झाल्यासारखे होते. यावर घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत.
उपाय
सर्वात महत्वाचे म्हणजे केस नेहमी स्वच्छ ठेवा. आठवड्यातून दोन वेळा तरी केस धूने गरजेचे आहे. केस धुताना सतत केमिकल युक्त शांपुचा वापर टाळावा. कारण त्यामुळे टाळूच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे तेल या शाम्पू मुळे निघून जाते.
लिंबाचा उपयोग करा त्यासाठी लिंबाचा रस घ्या आणि केसांच्या मुळापासून हलक्या हाताने मसाज करा आणि आयुर्वेदिक शाम्पू ने केस धुवा. त्यानंतर पुन्हा लिंबूचा रस केसांना चोळा पण यावेळी शाम्पू लावू नका तसेच पाण्याने धुवून टाका.
खोबरेल तेल, मध आणि दही हे एकत्र मिसळून केसांच्या मुळाशी मसाज करा आणि अर्ध्या तासाने केस धुवून टाका.
ऍपल व्हिनेगर हा ही केसांना लाऊन तुम्ही कोंडा घालऊ शकता, यामुळे तुमच्या टाळूच्या त्वचेचा पी एच बॅलन्स सांभाळला जातो आणि त्यामुळे कोंड्याची वाढ होत नाही.
दोन-तीन दिवसाचे शिळे (आबंट दही), थोडासा लिंबाचा रस, व्हिनिगर आणि आवळ्याचा रस यांच्या वापरानेही कोंडा कमी करता येतो.
कोंड्यासाठी दही हा अत्यंत गुणकारी आहे त्यासाठी आठवड्यातून तीन वेळा केसांच्या मुळाशी दही चोळा अर्ध्या तासाने केस धुवा नक्की फरक पडेल.
कडुनिंबाची पाने याची पेस्ट बनवून ती केसांच्या मुळांना लावावी याचा फायदा नक्कीच तुमच्या केसांना होईल.
रिठ्याची पावडर ही कोंडया साठी उपयोगी आहे त्यासाठी पाण्यात पावडर मिसळून ती पेस्ट केसांना चोळा आणि केस धुवा.
दह्यामध्ये बेकिंग सोडा घ्या आणि ही पेस्ट केसांच्या मुळाशी चोळा नक्की फरक जाणवेल तुम्हाला.