आपण कार्तिकी गायकवाडला तेव्हापासून ओळखतो जेव्हा ती सारेगमपा लिट्ल चॅम्प मध्ये तिच्या गोड आवाजाने तिने, अभंगाणी तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ह्या शो मध्ये तिला सर्वात जास्त मतदान मिळाल्याने ती हा रिऍलिटी शो जिंकली होती. कार्तिकी मधील खासियत म्हणजे तिने गायलेले गवळण, भारुडे, भक्तिगीते यात तिचा हात कोणीही धरू शकत नाही. त्याचप्रमाणे सध्या ती सोनी मराठी या चॅनलवर जय जय महाराष्ट्र या शो मध्ये दिसते.

पण सध्या ती वेगळ्या विश्वात आपले पाय ठेवत आहे. ते म्हणजे ती आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिचा साखरपुडा येत्या २६ जुलैला संपन्न होणार आहे. सध्या फक्त तिचा बघण्याचा कार्यक्रम पार पडला आहे. आता तुम्हाला तिचा नवरा आहे तरी कोण? ह्याची उस्तुकता लागली असेल तर तिच्या नवऱ्याचे नाव आहे रोनित पिसे. तो राहायला सध्या तरी पुण्यात आहे. शिक्षण म्हणाल तर तो इंजिनिअर आहे. शिवाय त्याचा स्वतःचा व्यवसाय ही आहे.
Sharmishtha Raut हीचा झाला आहे साखरपुडा
तिची पुढील वाटचाल म्हणजे तिच्या आयुष्यात निर्माण होणारे हे नवीन नाते तिला सुखाचे आणि समाधानाचे जाओ हीच आपल्या सर्व प्रेक्षकांकडून शुभेछ्या .पंढरीच्या वारीमध्ये तिने केलेले सूत्रसंचालन खरंच पाहण्याजोग होत. लोकांनी तिच्या ह्या कलेलाही भरभरून प्रोत्साहन दिलं. कार्तिकीच्या आळंदी येथील घरी नुकताच कांदे पोहेचा कार्यक्रम पार पडला. यात तिचे लग्न ठरल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत तीने शेअर केली आहे.

सर्वच स्तरावरून तिला शुभेच्छा येत आहे. मात्र तिच्या पुरुष चाहत्यांनी मात्र सोशल मीडियावर निराशा व्यक्त केली आहे. खूप लवकर लग्न करत आहे, असेही त्यांचं म्हणणं आहे. हे पण वाचा Ashok Saraf यांची हातातली अंगठी त्यांच्यासाठी का लकी आहे नक्की जाणून घ्या