सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत असणारा नवीन चेहरा म्हणजे कार्तिक आर्यन याने चिनी कंपन्यांसोबत जो काही करार केले होते किंवा ज्यावर काम चालू होये ते करार कार्तिक याने मोडले आहेत. कार्तिक आर्यन याने चिनी मोबाईल म्हणजे ‘ओपो’शी करार केला होता. हा करार कार्तिक याने मोडला आहे. असे काहीसे संकेत कार्तिक ने स्वतः इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर करत केले आहेत.
कार्तिक याने आयफोन घेऊन ढगांना कॅमेरात टिपताना फोटो अपलोड केला आहे. याचा अर्थ काय होतो तर कार्तिक याने ओप्पो मोबाईल वरचा करार सोडल्याचे स्पष्ट होत आहे. कारण एकदा कलाकार असो किंवा कोणीही तो एका मोबाईल ब्रँड सोबत करार बद्ध असल्यावर तो दुसऱ्या मोबाईल सोबत करार करू शकत नाही आणि आता हे स्पष्ट होत आहे की आर्यन याने आयफोन सोबत करार केला आहे.

लुकाछुपी’ आणि ‘लव्ह आज कल’ सिनेमातून तो लोकांना प्रचंड आवडला. त्याने जे पाऊल उचलले आहे त्याबद्दल त्याच्या मनात देशाबद्दल किती आत्मीयता आहे हे दिसून येते. कारण भारत आणि चीन हे देश या दोन्ही देशातील तणावाचे वातावरण पाहता कार्तिकने हे असे पाऊल उचलले हा असा पहिला अभिनेता आहे. त्याच्या ह्या कार्यासाठी एक लाईक तर बनतोच.
भारतात सध्या असंख्य लोक चिनी वस्तूवर बहिष्कार घाल त आहेत. हे करणे सुद्धा तेवढेच आहे. कारण आपण सीमेवर जाऊन युद्ध तर लढू शकत नाही पण ह्या इकॉनॉमी युद्धात सहभागी होऊन देशसेवा करू शकतो. जेवढं होईल तेवढे चिनी वस्तूंचा वापर टाळा. नवीन विकत घेतलेली वस्तू भारतीय कंपनी ची असावी असा विचार करा. तरच देशाला ह्याचा फायदा होईल.
बिग बॉस फेम असीम रियाज ने खरेदी केली आपली ड्रीम कार, पहा फोटोज्