टेलिव्हिजन क्षेत्रात खलनायिका म्हटलं की काम्म्या पंजाबीचे नाव अग्रेसर असते. आपल्या अदानी अनेक खलनायिका भूमिका तिने अत्यंत सहजतेने सादर केल्या आहेत. रेत, अस्तित्व, एक प्रेम कहाणी आणि बनू मे दुल्हन तुम्हारी ह्या मालिकेत निगेटिव्ह पात्र साकारले होते जे लोकांना आजही चांगले स्मरणात आहेत. तिने खलनायिकाच न करता चांगले पात्र ही अनेक मालिकेमध्ये रंगवले आहेत. ह्यात क्यू होता हैं प्यार, मर्यादा आणि पिया का घर ह्या मालिकांचा समावेश आहे.
अनेक बॉलीवुड सिनेमात सुद्धा छोट्या छोट्या भूमिका तिने साकारल्या आहेत. ह्यात कोई मिल गया, फिर भी दिल है हिंदुस्तानी, कहो ना प्यार है, ना तुम जाणो ना हम, यादे अशा सिनेमाचा समावेश आहे. पण तिला घराघरात ओळख तेव्हा मिळाली जेव्हा कलर्स वाहिनीवरील बिग बॉस सिझन सात मध्ये ती झळकली.
काम्म्या आपल्या वयक्तिक जीवनाबद्दल सुद्धा नेहमीच चर्चेचा विषय बनली आहे. २००३ मध्ये तिने बंटी नेगी सोबत लगीनगाठ बांधली. ह्या नात्यातून तिला एक मुलगी सुद्धा आहे. पण अवघ्या दहा वर्षातच हे लग्न मोडले आणि २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर करण पटेल सोबत दोन वर्ष डेटिंग केल्यानंतर सुद्धा ह्या दोघात दुरावा आला. पण हे वर्ष काम्म्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले कारण तिने आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे लग्न केलं आहे.

शालाभ डांग सोबत तिने लगीनगाठ बांधली आहे. सध्या ह्या दोघांचे फोटो इंटरनेटवर खूप वायरल होत आहेत. ह्या दोघांचाही हिंदू पद्धतीने विवाह झाला. महत्त्वाचे म्हणजे काम्म्या तिच्या सोशल नेटवर्कर एक हळदीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्यात मराठमोळे गाणे गुलाबाची कळी बॅकग्राऊंड वाजताना आपल्याला पाहायला मिळते.