Home करमणूक सध्या काळया रंगाचे फळे तसेच भाज्या पाहायला मिळत आहेत तुम्ही खाल्ली आहेत का कधी?

सध्या काळया रंगाचे फळे तसेच भाज्या पाहायला मिळत आहेत तुम्ही खाल्ली आहेत का कधी?

by Patiljee
524 views

जसं जशी या जगात प्रगती होत चालली आहे तसे तसे काही ठिकाणी आपल्याला भाज्या आणि फळं हे सुध्दा वेगळ्या प्रकारात पाहायला मिळतात. आता हेच बघा ना काही वर्षांपूर्वी आपल्याला शिमला मिरची फक्त हिरव्या रंगात पाहायला मिळायची पण आता ती आपल्याला पिवळ्या आणि लाल रंगात पाहायला मिळते. फ्लॉवर ही आपल्याकडे फक्त पांढऱ्या रंगाचे माहीत होते. पण आता तर हिरव्या रंगाचे आणि गुलाबी रंगाचे फ्लॉवर ही आपल्याला मार्केट मध्ये पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारे काही भाज्या आणि फळं आहे त्यांचा रंग हा काळा आहे.

काळया रंगाचे गाजर
आपल्याला फक्त लाल रंगाचे गाजर माहीत आहेत आणि त्यांचे फायदे ही आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असतील. पण काळे गाजर अजुन तरी पाहायला मिळाले नाही. काही लोकांनी पाहिले ही असतील. काही देशात हे गाजर विकले जातात आणि खाल्ले जातात. या गाजर पासून वेगवेगळे पदार्थ ही बनवतात त्यांचा रंग ही काळा होतो. काळे गाजर खाल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे ही मिळतात. नुसतेच खाले किंवा याचा रस काढून प्या हे गाजर खाल्याने तुमचा उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो. तसेच तुमच्या शरीरातील रक्त ही साफ करते. शिवाय त्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आजार ही कमी होतात.

काळे गुलाब
आपण गुलाबाला फुलांचा राजा म्हणतो. जसे वेगवेगळ्या रंगाचे गुलाबाचे फुल आपल्या देशात पाहायला मिळते. तसेच ते काळया रंगाचे ही असते. हे गुलाब तुर्की मध्ये जास्त पाहिले जातात.

काळे बांबू
चीनच्या हुनान प्रांतात या काळया रंगाच्या बांबूची निर्मिती केली जाते. शिवाय या काळया रंगाच्या बांबूच्या बिया संपूर्ण जगात विकल्या जातात. आपल्याला फक्त हिरव्या रंगाचा बांबू असतो तेच माहीत आहे. पण काळया रंगाचा बांबू अजूनही पाहायला मिळाला नाही.

काळी स्ट्रॉबेरी
हिला ब्लॅक स्ट्रॉबेरी असे म्हणतात. आपल्याकडे फक्त लाल रंगाची स्ट्रॉबेरी पाहायला मिळते. काळी स्ट्रॉबेरी आपल्यापैकी काही जणांना माहीतही नसेल? पण जगात वेगवेगळ्या भागांमध्ये ही स्ट्रॉबेरी पहिली जाते. वैज्ञानिकांनी ही स्ट्रॉबेरी बनवताना त्यात काहिक आनुवंशिक बदल केले नाहीत.

काळे टोमॅटो
काळे टोमॅटो पहिल्यांदा नाव ऐकले असेल ना पण काळया रंगाचे ही टोमॅटो आहेत. सध्या आपल्या देशात ही यांची लागवड केली जाते. हे वरून दिसायला काळया रंगाचे असतात पण आतून यांचा रंग लाल असतो. शिवाय चवीला हे जरा खारट असते. हा काळया रंगाचा टोमॅटो युरोप मध्ये खूप खाल्ला जातो आणि त्याला इंडिगो गुलाब लाल असे नाव आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल