आपल्याला फक्त रोजचा पांढरा मीठ माहीत आहे आणि तोच मीठ आपण खात आलेलो आहोत. त्यामुळे बऱ्याच जणांना काळा मीठ काय हे माहीत नसेल तर काही जणांना माहीत असेल. शिवाय ती लोक आपल्या आहारात याचा उपयोग ही नक्कीच करत असतील. पाणी पुरी, चाट मसाला तसेच लिंबू सरबत हे बाजारात मिळते यांसारख्या पदार्थांमध्ये हा मीठ वापरला जातो या मीठा मुळे पदार्थाला एक वेगळीच चव येते. त्याचबरोबर हे मीठ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
समुद्री मीठ, सैंधव मीठ आणि काळे मीठ असे वेगवेगळ्या प्रकारचे मीठ आहेत. मार्केटमध्ये रिफाइंड आणि क्रिस्टल अशा दोन प्रकारचे मीठ मिळतात. रिफाइंड मीठ पांढ-या रंगाचे असते. तर काळा मीठ कसा बनला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? हा मीठ ज्वालामुखीच्या दगडापासून तयार केला जातो. याला काळा मीठ म्हंटले जाते पण खरं तर याचा कलर गुलाबीसर असतो शिवाय या मिठांमधे सोडियम क्लोराईड असते यामुळे याची चव खारट असते.
तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉलचा त्रास असेल तर तुम्ही पांढरे मीठ खाणे ताबडतोब बंद करा. त्याऐवजी काळे मीठ तुमच्या रोजच्या आहारात घ्या. यामुळे तुमचे उच्च रक्तदाब नॉर्मल होण्यास मदत होईल. तुमचा घसा खवखव त असेल तर त्यावरही तुम्ही याचा उपयोग करू शकता यासाठी नाकात ओढणारी इनहेलर घ्या त्यात थोडे मीठ टाका आणि ते दिवसातून दोन वेळा नाकात ओढा. त्याचप्रमाणे गरम पाण्यात हे मीठ घालून त्याने गुरल्या कराव्यात त्यामुळे ही तुमचा घसा मोकळा होतो.
तुम्हाला उलटी आणि मळमळ होत असेल तर यावर काळे मीठ अत्यंत योग्य उपाय आहे उलटी सारखे होत असेल तर जिभेवर थोडे काळेमिठ ठेवा. यामुळे तुमची उलटी येणे बंद होईल,मळमळ होत असल्यास त्यामध्ये काळ्या मिठाच्या सेवनाने आराम पडतो. तुमच्या हाताला किंवा पायाला सूज आली असेल तर एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात मीठ टाकावे आणि हात किंवा पाय त्यात बुडवून ठेवावे तुम्हाला आराम मिळेल.
एक चिमुटभर काळे मीठ टोमॅटोच्या रसामध्ये घालून हे दररोज प्यायल्याने केसांसंबंधी तक्रारी दूर होण्यास मदत मिळेल. काळ्या मीठाचे पाणी घेऊन ते लिंब घालून प्यायल्यास पचनसंस्था बळकट होते. मजबूत पाचन तंत्रामुळे गॅस, अल्सर, बद्धकोष्ठता यासारखे आजार आपोआपच दूर होतात.