पुण्याचा शनिवारवाडा लॉकडावून लागल्या पासून बंद आहे त्याला आता एक वर्ष होईल. त्यानिमित्ताने एक गोष्ट आठवली ती म्हणजे वाड्यातील रहस्यमयी आवाजांची. ” काका मला वाचवा ” ” काका मला वाचवा ” अशी हाक तिथे रात्री अपरात्री ऐकू येते असं म्हणतात. पुण्यात येणाऱ्या आणि वाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना कदाचितच ही गोष्ट माहीत नसेल. पुण्यातल्या अगदी पोरा सोरांच्या तोंडावर असणारी ही गोष्ट प्रत्येकालाच ज्ञात आहे. मात्र या गोष्टी मागची खरी गोष्ट फारच कमी लोकांना माहीत आहे. चला तर मग याच रहस्यमगच्या गोष्टींचा उलगडा करूया.
शनिवार वाडा हि वास्तु बाजीराव पेशव्यांनी राहण्यासाठी बांधली अगदी सुरुवातीला हि साधी हवेली होती पण नंतर पेशव्यांच्या वंशजांनी ( नानासाहेब, माधवराव ) वैगरेंनी हिचा विस्तार केला आणि तटबंदी बांधली हे पेशव्यांच्या कुटुंबाचं निवासस्थान होत. इथूनच कारभार पहिला जाई. पेशव्यांकडून जेव्हा कारभाराचा विस्तार होऊ लागला होता. मराठ्यांचा झेंडा अटकेपार फडकण्यासाठी दौडत होता. सहाजिकच पेशवेपद आणि गादी मिळवण्यासाठी वरसांमध्ये चढाओढ निर्माण झाली. त्या वेळी पेशवे पद सांभाळणारे नानासाहेब यांच्या नंतर वारसा हक्काने त्यांच्या जेष्ठ पुत्राला म्हणजेच नारायणराव यांना गादी मिळली. यामुळे नानासाहेब यांचे धाकटे बंधू म्हणजेच रघुनाथराव यांची नाराजी स्पष्ट होती.
नियमानुसार त्यांना पेशापेपद मिळायला हवे अशी त्यांची इच्छा होती. मात्र कारभार योग्य व्यक्तीच्या हातात जावा अशा विचाराणे व्यसनी आणि अविचारी पध्दतीने वर्तणूक करणाऱ्या रघुनाथराव यांना गादी देने टाळले. याचा राग रंगुनाथ राव यांच्या मनात होताच. पेशवेपद कसे मिळवता येईल या विचारात दिवसरात्र पिण्यात आणि बैठका रंगवण्यात जात होत्या. त्यांच हव्यासापोटी पेशव्यांच्या कुळाच्या नाशाची सुरवात झाली.रघुनाथराव यांनी वाईट मार्गाने काटा काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्या वेळी अघोरी विद्येचा आधार घेत त्यांनी काळ्या गणपतीची स्थापना केली होती. काळ्या गणपतीला शापित गणपती असेही म्हणतात. याविषयी देखील सविस्तर माहितीची एक पोस्ट टाकलेली आहे. ती वाचू शकता.
तर या गणपती विषयी थोडक्यात सांगायचे झाले.तर हा अघोरी गणपती जो कुणी या गणपतीची स्थापना करून पूजा करीत असे त्याला फार वाईट अनुभव येत असत. मनोभावे आराधना करणाऱ्यांच्या कुळाचा नाश देखील निश्चित असे. या अशा अघोरी गणपतीची स्थापना रघुनाथराव यांनी वाड्यात केली असे सांगितले जाते. त्या गणपतीची पूजा करत त्यांनी आराधना सुरू केली. रघुनाथरावने नारायणराव यांना मारण्यासाठी मारेकरी धाडले असताना. त्यांच्यापासून वाचत पेशवे नारायणराव रघुनाथराव यांच्या वाड्यात मदतीची हाक देत शिरले.. ” काका मला वाचवा ” ” काका मला वाचवा ” ही आर्त हाक अख्ख्या वाडाभर घुमली.
मात्र पाठमोरी बसेलल्या चुलत्याने मागे वाळूनही पाहिले नाही. ” काका मला वाचवा ” ही आर्त किंकाळी शेवटची ठरली. पाठमोऱ्या पेशवा नारायणराव यांच्यावर तलवारीचा वार झाला. तोच त्या अघोरी गणपतीची पहिला बळी होता असेही सांगितले जाते. नारायण पेशवा यांना मारल्यानंतर रघुनाथराव यांना देखील आजन्म कारावसाची शिक्षा झाली. झुरून झुरून मृत्यू झाला. मात्र त्यानंतर तिथल्या लोकांना आजही ती आर्त किंकाळी ऐकू आल्याचे भास होतात. वाड्यातच नानासाहेबांचे धाकटे पुत्र आणि पेशवे नारायणराव यांचा गारद्यांनी निघृण खुन केला ज्याला जबाबदार त्यांचे चुलते रघुनाथराव पेशवे होते,असं सांगितलं जातं की नारायणराव जीव वाचवण्यासाठी रघुनाथ रावांच्या घरात गेले की काका मला वाचवा अशी हाक दिली पण गारद्यांनी रघुनाथ रावांच्या समोर त्यांचा खुन केला.
पुढे हा वाडा शापित आहे इथं नारायणरावांचा आत्मा आहे अशी समजूत दुसऱ्या बाजीरावाची होती म्हणून त्याने विश्रामबागवाडा बांधला ! ब्रिटिश सरकारने ह्या वाड्यात इस्पितळ सुरू केले पण त्याची देखभाल दुरुस्ती केली नाही परीणामी १८२८ सालच्या आगीत वाडा भस्म होऊन फक्त तटबंदी दरवाजा आणि जोते शिल्लक आहेत. मात्र अजूनही लोकं आवर्जून तिथे भेट देतात. विश्रामबाग वाडा आणि शनिवारवाडा पहिला नाही तर पुण्यात येऊन काय पाहिलं हे ही आहेच.