काजोल आणि अजय देवगण यांनी सध्या तरी लोकांच्या मनावर आपली चांगलीच छाप सोडली आहे. कारण ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या ऐतिहासिकपटाच्या निमित्ताने ही जोडी आपल्याला तब्बल दहा वर्षांनी एकत्र काम करताना पाहायला मिळते आहे. दहा वर्षांपूर्वी या जोडीने हिट चित्रपट देऊन प्रेक्षकांचे मन जिंकले होते आणि आता ही या दोघांची भूमिका या सिनेमात अतिशय वाखडण्याजोगी आहे. काजोल हिने अजय देवगणची पत्नी हीचा रोल या सिनेमात केला आहे. म्हणजे हे दोघे नरवीर तान्हाजी मालुसरे आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत आहेत.
काजोल हिला मराठी उत्तम बोलता येते कारण तिची आई तनुजा ही स्वतः एक मराठी घरातून जन्माला आलेली अभिनेत्री आहे. आता या चित्रपटात काजोल हिने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्रथम आपल्या पेहरवाबद्दल बोलली यात काजोल ने नऊवारी साडी, कपाळावर ठसठशीत कुंकू, हातभरून हिरवा चुडा, नथ असा मराठी साज केला आहे. आणि खरोखर या वेशात काजोलचा रुबाब काही वेगळाच दिसतो आहे.
नऊवारी साडी बद्दल बोलताना काजोल ने तिच्या बद्दल च्या काही जुन्या आणि तिच्यासाठी खास असणाऱ्या आठवणी शेअर केल्या. एक आठवण अशी की ती जेव्हा सात वर्षाची होती तेव्हा तिने शाळेत एका नाटकात भाग घेतला होता. त्यामध्ये तिने असाच पेहराव केला होता नऊ वारी साडी ते दागिने ते अजूनही तिच्या लक्षात आहे. शिवाय दुसरी आठवण म्हणजे अजय देवगण आणि काजोल या दोघांच्या लग्नाच्या दिवशी काजोल हिने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. अतिशय मराठमोळ्या पद्धतीने हा विवाह झाला होता. या दोन्ही आठवणी आणि त्यांचे काढलेले फोटो अजूनही तिच्याकडे आहेत.

काजोल सांगते की नऊवारी साडी एखादया कार्यक्रमात नेसणे आणि शूटिंगच्या वेळी नेसणे यात खूप फरक आहे. कारण संपूर्ण चित्रपटात नऊवारी साडी नेसून शुटींग करणे खूप कठीण गोष्ट आहे. पण ह्या सिनेमात मी नऊवारी साडी नेसून जेव्हा पहिला फोटो आईला पाठवला तेव्हा तिचा रिप्लाय पाहून डोळ्यात पाणी आलं. तिच्या मते मी ह्या साडीत तिच्या आई सारखी म्हणजेच माझ्या आजी सारखी दिसत आहे. ही माझ्यासाठी सर्वात मोठी कौतुकाची गोष्ट होती.