Home हेल्थ कडुलिंबाची पाने बघा आपल्यासाठी कोणकोणत्या आजारांवर उपयोगी आहेत ते

कडुलिंबाची पाने बघा आपल्यासाठी कोणकोणत्या आजारांवर उपयोगी आहेत ते

by Patiljee
1696 views

कडुलिंबाच झाडे गावा ठिकाणी तुम्हाला जास्त आढळतील पण ही झाडे इतकी आपल्या साठी उपयोगी आहेत की याचा उपयोग केल्यास त्याचे फायदे आपल्याला नक्की मिळतात. या पानात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीवायरल हे गुण असतात यामुळे तुमच्या स्किन इन्फेक्शनचा धोका टळतो, आपल्या शरीरासाठी आवश्यक असे गुण असल्यामुळे कडुलिंब सौदर्यवर्धक अशा उत्पादकांमध्ये हमकास वापरतात.

पण इतके माहीत असूनही आपण या पानांचा योग्य तो उपयोग करत नाही. या झाडाची पाने कडू असल्यामुळे त्याला कडुलिंब असे म्हणतात. या झाडाला लिंबाच्या आकाराची छोटी छोटी अशी फळे असतात त्यांची चव ही कडू असते, इतकचं काय तर या झाडाची साल, फळ, बिया, पाने आणि मुळे हे सर्वच कडू असतात.

खोबरेल तेलात ही कडुलिंबाची पाने काळी होईपर्यंत तळून काढावी आणि ह तेल आपल्याला केसांना लावावे या मुळे तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.
शिवाय ही पाने पाण्यात उकळून त्याने केस धुतल्याने ही केसांच्या सर्व समस्या दूर होतात त्याचबरोबर अंघोळ केल्याने त्वचा रोगावर ही परिणाम कारक असे हे औषध आहे.

मधुमेह झालेल्या व्यक्तीने कडुलिंबाचा रस घेणे म्हणजे अत्यंत हितकारक आहे. हे सर्वानाच माहित आहे पण ते कडू असल्याने लोक प्यायला कंटाळा करतात पण हे रस जरी कडू असले तरी त्यामुळे आपला इंसुलिन बॅलेंस राहतो.

या पानाने नियमित दात घासल्याने तुमच्या दातांच्या समस्या दूर होऊन दात निरोगी राहतील.

तुमच्या चेहऱ्यावर मुरूम सतत येत असतील तर त्यावर ही कडुलिंबाच्या पानाची पेस्ट लावावी आणि त्यानंतर धुवावी.

पोटात जंत झाले असतील तर यावर ही हा रस उपयोगी आहे या रसात थोडे गूळ मिसळून हा रस एक चमचा तीन दिवस घ्या.

अँटीबॅक्टेरियल गुण असल्यामुळे ही पाने बारीक करून जखमेवर लावल्यास तुमची जखम लवकर भरून येण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल