जोतिबाचा डोंगर पाहिले आहे का तुम्ही? आपल्यातील काही लोकांनी पाहिले ही असेल पण ज्या लोकांनी पाहिले नाही त्यांनी जाऊन या. कोल्हापूर मधील हिंदूंचे हे तीर्थक्षेत्र आहे. कोल्हापूरच्या वायव्य बाजूस काही किलोमिटर गेल्यावर आपल्याला जोतिबा डोंगर मिळतो. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. डोंगराला वाडी रत्नागिरी हे ही नावं आहे.
डोंगर पन्हाल्याकडून कृष्नेकडे गेलेल्या सह्याद्रीचा एक भाग आहे. ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत, ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात. या डोंगरात जोतिबा गाव आणि मंदिर आहे. श्री जोतिबा हे केदारेश्वराचे एक रूप आहे. ब्रम्हा, विष्णु, महेश आणि या सर्वाचे मिळून ज्योतिबा हे देवाचे रूप आपल्याला पाहायला मिळते.
हे मंदिर हेमाड पंथी पद्धतीचे असून तत्काळ मराठी वस्तिशैलीचा प्रभाव आपल्याला येथे दिसून येतो. या मंदिराच्या आवारात पारंपारिक अशी दगडी दीपमाळ आहे. काळया दगडात घडवलेली ही ज्योतिबा ची मूर्ती आपल्याला आकर्षित करते. चतुर्भुज असणारी मूर्ती त्रिशूळ डमरू खडग व पानपत्र आहेत. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर बाहेर असणाऱ्या काळभैरव आणि त्यांच्या ज्योतीचे दर्शन घेतले जाते.
ज्योतिबा यांच्या जन्मदिवधी म्हणजे दर रविवारी आणि श्रावण शुद्ध षष्ठीला येथे भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. चैत्र पौर्णिमेला रतनासुर या राक्षसाचा वध केल्यामुळे या दिवशी या ठिकाणी खूप मोठी जत्रा भरते. या दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये अनेकजण ससाणा काठ्या नाचवत नेतात. मूळ देवालयाचे बांधकाम जोतिबा भक्त किवळ गावच्या नावजी ससे पाटलांनी (संत नावजीनाथ) केलेले आहे असे म्हणतात. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळय़ा बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे.
ज्योतिबा या देवाची एक पूर्वीपासून ची कहाणी आहे ती म्हणजे प्राचीन काळी कोल्हापूर या ठिकाणी एका रत्नासुर नावाच्या राक्षसाने हाहाकार माजवला होता कोल्हापूर च्या आंबा मातेला ही या दैत्याने त्रास द्यायला सुरुवात केली त्यानंतर अंबा मातेने घोर तपश्चर्या करून केदारेश्वर ला या राक्षसाचा वध करण्याची विनंती केली. त्यानंतर केदारेश्वराचे या राक्षसाचा वध केला तो ह्या डोंगरावर आणि त्या दिवसापासून या डोंगराला वाडी रत्नागिरी असे नाव पडले आहे. यापुढे कोणत्याही प्रकारचे संकट आल्यावर ज्योतिबा ने नेहमी आपल्या सोबत राहावे असे अंबा मातेचे वचन ऐकुन ज्योतिबा याने अंबा मातेच्या दक्षिण दिशेला आपले देवस्थान स्थापन केले आहे.