बॉलिवुड सिनेमात खूप सारे चित्रपट करून ते चित्रपट लोकांच्या मनात उतरवण्याचे काम चुही हिने केले ‘डर’, ‘कयामत से कयामत तक’, ‘हम हैं राही प्यार के’, ‘इश्क’ या चित्रपटांत तिची महत्वाची भूमिका होती आणि खरच हे चित्रपट आपल्याला जुहीची तारीफ करायला भाग पडतात. पण आता सध्या तरी ती या चंदेरी दूनियेपासून लांबच लांब आहे. पण तरीही ती येथे थांबली नाही ती बाहेर सामाजिक कार्य करते आहे आणि तेच तिने आपल्या मुलाला म्हणजे अर्जून मेहता यालाही शिकवले आहे. खरतर हे सगळं शिकवायची गरज नाहीच आहे. आपल्या आई वडिलांचे गुण हे मुलांमधे उतरतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे.

सध्या झालेल्या ऑस्ट्रेलिया येथील आगीमुळे तेथील खूप जास्त नुकसान झाले आहे. प्राणी जीवन, निसर्गाची हानी, लोकवस्ती इत्यादी सर्व प्रकारे येथील लोकांना फटका बसला आहे १ हजार ३०० पेक्षा जास्त घरं नष्ट झालीत. तर 50 कोटींपेक्षा जास्त प्राणी नष्ट झाले आहेत. आणि त्यासाठी सगळ्यात स्थरातून मदत होत आहे. यात जुही चावला हीचा मुलगा याने ही सढळ हस्ते मदत केली आहे. त्याने आपल्या पॉकेट मनी मधील ३०० पाउंड तेथील लोकांना पाठवले आहेत. यावर तिच्या मुलाने जुहीला प्रश्न विचारला की तू कशी मदत करणार या लोकांना त्यावर तिने उत्तर दिले मी कावेरी कॉलिंग प्रकल्पाच्या माध्यमातून वृक्षारोपण करून मदत करणार आहे.
तिचा मुलगा अर्जून मेहता हा सध्या ब्रिटन मध्ये आपले शिक्षण पूर्ण करतोय त्याच्या या कार्याला सर्व ठिकाणाहून वाहवाह होत आहे. त्यामुळे जुही हिला सुद्धा आपल्या मुलाने केलेल्या कार्याचा अभिमान वाटत आहे.