क्रिकेटमध्ये जगातील सर्वात चांगला फिल्डर कोण होता? असा कुणी प्रश्न केला तर सर्वांचे उत्तर एकच असेल ते म्हणजे जोंटी रोड्स. आजही त्यांच्या फिल्डींगचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत तर अजुन त्याच्यासारखा फिल्डर कुणी नसेल असे तुम्ही समजाल. साऊथ आफ्रिका संघासाठी अनेक सामने त्याने आहे क्षेत्ररक्षणाने जिंकवून दिले आहेत. १९९२ मध्ये त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले तर २००३ मध्ये सन्यास घेतला. पण आज आम्ही तुम्हाला त्याच्या क्रिकेट बद्दल नाही तर त्याच्या वयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत.
जोंटीची लव लाईफ अतिशय रोमांचक आहे. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी केट मैककार्थी हिच्यासोबत लग्न केलं होतं. हीच्याकडून त्याला दोन मुलेही आहेत. पण ह्यांचा संसार फक्त १६ वर्ष टिकला आणि त्यांनी घटस्फोट सुद्धा घेतला. ह्या घटस्पोटामागे जोंटीची प्रेयसी केरोलीन मेकलेंड होती असे अनेक वृत्त वाहिन्यांनी त्यावेळी सांगितले होते. जोंटी आणि केरोलीन कॉलेजपासूनचे मित्र होते. पण तरीही त्यांनी लग्न न करता दोघांनी वेगळा जोडीदार निवडला.
पण जेव्हा केरोलीनच्या पतीचे निधन झाले तेव्हा ह्या दोघांच्या भेटीगाठी परत सुरू झाल्या. २०११ मध्ये जेव्हा जोंटी भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा त्याने केरोलीनला सोबत आणले होते. इथे सर्वांना हेच सांगितले की ही त्याची प्रेयसी आहे आणि दोघांनी ही साखरपुडा केला आहे. पण सर्व सुरळीत चालू असताना तुम्हाला असे वाटेल की जोन्टी ने केरोलीन सोबत लग्न सुद्धा केले असेल तर असे नाहीये.
केरोलीन आणि जॉन्टी आपल्या नवीन संसारासाठी जेव्हा घर डेकोरेट करत होते, तेव्हा त्यांनी ह्याचे काम मेलेनी वोल्फ ह्या युवतीला दिले होते पण इथेच होत्याचं नव्हतं झालं. जोंटी आणि मेलेनीचे प्रेम प्रकरण सुरू झाले. आणि त्या दोघांनी केरोलीनला बाजूला ठेऊन २०१४ मध्ये लग्न केले. सध्या ते दोघे एकत्र आहेत आणि सुखी संसार करत आहेत. २०१५ मध्ये जेव्हा त्यांना मुलगी झाली तेव्हा त्यांनी तिचे नाव इंडिया असे ठेवलं. २०१७ मध्ये त्यांना एक मुलगा देखील झाला.