देवी जीवदानी ही भक्तांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देणारी देवी आहे असं म्हणतात की ती माहूरगड येथील नांदेडची देवी रेणुका हीचा अवतार आहे. हा जीवदानी देवीचा प्राचीन मंदिर डोंगरावर आहे. जो विरारमधील सातपुडा पर्वत यांचा हिस्सा आहे. हे मंदिर 900 फूट उंचीवर आहे शिवाय ते चढण्यासाठी सिमेंट काँक्रिटच्या पायऱ्या ही बनवल्या आहेत या पायऱ्यांची संख्या 1400 इतकी आहे. या मंदिराच्या कळसावर नेहमीच भगवा झेंडा फडकताना दिसतो.

मंदिराच्या उंचीवरून हिरवेगार डोंगर वाऱ्यावर डोलणारी झाडे यांचे दर्शन घडते. सतराव्या शतकापर्यंत येथे जीवधन नावाचा किल्ला अस्तित्वात होता. मात्र कालौघात त्याचे अस्तित्व नष्ट झाले. मात्र त्याच्या प्राचीन खुणा अजूनही शिल्लक आहेत. याच किल्ल्यावरील हे मंदिर अजूनही अस्तित्वात आहे. १९५६ मध्ये या मंदिरात देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि तेव्हापासून हे मंदिर भाविकांमध्ये प्रसिद्ध झाले. दर वर्षी नवरात्र मध्ये येथे येणाऱ्या भाविकांची संख्या अलोट असते.
मंगळवारी आणि गुरुवारी या मंदिरात जाने खूप लाभदायक असते असे म्हणतात. पुराणात सांगितल्याप्रमाणे जेव्हा पाच पांडव वनवासाला गेले होते तेव्हा या मंदिरात ही ते गेले होते तसेच त्यांनी वैतरणा नदीवर आराम ही केला होता. या देवीचे दर्शन घेतल्यानंतर पांडवांच्या मनात आपुलकी निर्माण झाली होती त्यामुळे त्यांनी शिरगाव जवळ डोंगराच्या गुहेमध्ये देवी एकविरेचे प्रतिरूप स्थापन केले.
त्या दिवेची पूजा केली त्यांनी देवीला भगवती जीवदानी असे नाव दिले आणि येथे यात्रा करण्यासाठी आलेल्या साधूनसाठी ही गुहांचा एक समूह ही बनवला आहे ज्याला आता पांडव डोंगरी असे म्हणतात. असे म्हणतात की ज्या महिलांना मुल नाही अशा महिलांनी मनोभावे या देवीची उपासना केल्यास ही देवी नक्कीच प्रसन्न होते. जीवदानी देवीवर विश्वास ठेवणारे शेकडो भक्तगण नेहमीच येथे येत असतात. येथे येणारे भक्त जेव्हा या देवीची मनापासून उपासना करतात तेव्हा ही देवी नेहमीच त्याच्या पाठीशी उभी असते.