जितेंद्र जोशी हे नाव मराठी सिने सृष्टीला नवीन नाही. पण मराठी पाठोपाठ हिंदी क्षेत्रात सुद्धा जितूने आपला दबदबा निर्माण केला आहे. Netflix वरील सुप्रसिद्ध वेब सिरीज सेक्रेड गेम्स मधून त्याने काटेकर ही भूमिका करून खूप लोकांची वाह वाही मिळवली होती. ह्या सिरीज मध्ये सरताज सिंह म्हणजेच सैफ अली खान ह्याच्या मुख्य कॉन्स्टेबलची भूमिका साकारली होती. ही भूमिका लोकांना खूप जवळची वाटली. अनेक दिग्गजांनी सुद्धा जितेंद्र जोशीच्या अभिनयाचे कौतुक केले होते.
ह्या सिरीज नंतर जितू परत हिंदी सिनेमा किंवा सिरीज मध्ये दिसला नाही पण आता त्याची मोठ्या दिमाखात परत एकदा एन्ट्री होत आहे. शाहरुख खानच्या निर्मिती खाली तयार झालेली बेताल ही वेब सिरीज Netflix वर २४ मे ला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ह्या सिरीजमध्ये जितू तुम्हाला निगेटिव्ह पात्र साकारताना दिसेल. हे पात्र स्वार्थी, स्वतःचा विचार करणारा, पैशाच्या मागे लागणारा, लालची लोकांना वेडे बनवणारा असे असणार आहे.
ही सिरीज हॉलिवुड सिनेमासारखी थ्रिलर असणार आहे. तुम्ही बऱ्याचदा इंग्लिश सिनेमात झोंबी सिनेमे पाहिले असतील. बॉलिवूड मध्ये एक दोन सिनेमे सोडून असा प्रयत्न आजवर कुणी केला नाहीये. पण ही वेब सिरीज काहीतरी वेगळं लोकांना घेऊन येणार आहे. सिरीज पाहताना तुम्ही हॉलिवुड सिनेमा पाहत आहात का? असा भास होईल. ह्या सिरीज मध्ये जितेंद्र जोशी, आहाना कुमरा, विनीत कुमार असणार आहेत.
ह्या सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही सिरीज तुम्हाला २४ मे रोजी पाहता येईल.