Home बातमी जियोचे भन्नाट अँप लाँच

जियोचे भन्नाट अँप लाँच

by Patiljee
629 views
JioMeet

जियो ने भारतामधे खऱ्या अर्थाने नेटक्रांती घडवून आणली आहे. अत्यंत कमी लोक ह्या इंटरनेट क्षेत्रात सक्रिय होते पण जेव्हापासून जियो ने भारतीय टेलिकॉम मध्ये एंट्री घेतली आहे. ही संख्या मोठ्या जोमाने वाढली आहे. आता प्रत्येक दहा माणसातील ९ व्यक्तीकडे इंटरनेट सेवा उपलब्ध आहे.

जियो कंपनी प्रत्येक वेळी मार्केट मध्ये काही ना काही हालचाली करून प्रेक्षकांचे लक्ष स्वतःकडे केंद्रित करत असते. आधी सिम, नंतर वायफाय, आणि आता काही महिन्याने चालू होणारा जियो मार्ट असो. आज पुन्हा एकदा जियोने नवीन अँप लाँच करून सर्व लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं आहे. JioMeet असे ह्या अँपचे नाव असून ऑनलाईन मीटिंग साठी तुम्ही ह्या अँप चा उपयोग करू शकता.

लॉक डाऊन काळात ऑनलाईन अँपना खूप मागणी आहे. सर्व लोक घरात राहून आप आपली कामे करत आहेत. ह्या अँप मध्ये झूम ह्या अँपने बाजी मारत सर्व ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. ह्याच अँपला टक्कर देण्यासाठी जियो कडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप जियो मिट लाँच करण्यात आले आहे.

हे अँप अँड्रॉइड आणि आयओएस साठी मोफत उपलब्ध आहे. तर ह्या अँप चे खास वैशिष्ट म्हणजे एकाच वेळी तुम्ही १०० लोकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बोलू शकता. स्क्रीन शेअर करण्यापासून ते मीटिंग शेड्युल करण्यापर्यंत अनेक ऑप्शन तुम्हाला अँप मध्ये मिळतील. आणि महत्त्वाचे म्हणजे हे अँप भारतीय आहे त्यामुळे तुम्ही ह्या अँप चा वापर केला पाहिजे.

अँप कसे डाऊनलोड कराल?

  • अँड्रॉइड वाले प्ले स्टोअर वरून अँप फ्री मध्ये डाऊनलोड करू शकता. आणि आयओएस वाले अँप स्टोअर मधून डाऊनलोड करू शकता.
  • पीसी वापरणाऱ्यानी इथे जाऊन https://jiomeetpro.jio.com/home#download हे अँप डाऊनलोड करा.

हे पण वाचा तुमच्या मोबाईल मध्ये हे अँप असतील तर उडवून टाका

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल