Home बातमी Jio धमाका : ३९९ रुपयात Netflix, Amazon Prime, Disney Hotstar फ्री मध्ये पाहता येणार

Jio धमाका : ३९९ रुपयात Netflix, Amazon Prime, Disney Hotstar फ्री मध्ये पाहता येणार

by Patiljee
492 views
Jio new offer

जियो (Jio) च्या नवनवीन ऑफरची वाट आपण नेहमीच पाहत असतो. काहीतरी वेगळं आणि हटके ऑफर नेहमीच जियो आपल्याला देत असते. त्यातच जियोची दन दना दन ऑफर (Jio Dan Dana Dan Offer) नेहमीच ग्राहकांसाठी खास असते आणि ग्राहक सुद्धा मोठ्या आतुरतेने त्याची वाट पाहत असतात.

जियो ने दन दना दन ऑफर पुन्हा एकदा ग्राहकांसाठी आणली आहे. पण ह्यावेळी ही ऑफर पोस्टपेड ग्राहकांसाठी आहे. ह्या रिचार्जची सुरुवात ३९९ पासून होणार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ह्या सर्व ऑफरमध्ये Netflix, Amazon Prime आणि Disney Hotstar हे आपल्याला फ्री मध्ये पाहायला मिळणार आहेत. जाणून घेऊया काय आहेत प्लॅन.

Jio ३९९ चा प्लॅन

ह्या प्लॅन मध्ये तुम्हाला ७५ जिबी डाटा अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री मेसेजिंग सुविधा मिळेल. (१०० टेक्स्ट मेसेज एक दिवस). यासोबत नेटफ्लिक्स, अमेजन प्राइम वीडियो आणि डिज्नी प्लस हॉटस्टार वीआईपी सुविधा सुद्धा मिळेल. ह्यामध्ये २०० जीबी डाटा रोलओवर केला जाऊ शकतो.

Jio new offer

५९९ चा प्लॅन

ह्या प्लॅन मध्ये तुम्हाला १०० जिबी डाटा अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री मेसेजिंग सुविधा मिळेल. ह्या प्लॅन मध्ये सुद्धा तुम्हाला अमेजन प्राइम, नेटफ्लिक्स आणि डिज्नी प्लस हॉटस्टार वीआईपी ची सुविधा प्राप्त होईल. फॅमिली प्लॅन सोबत एक सिम कार्ड सुद्धा मोफत देण्यात येईल.

Jio new offer

७९९ चा प्लॅन

ह्या प्लॅन मध्ये तुम्हाला १५० जिबी डाटा अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री मेसेजिंग सुविधा मिळेल. अमेजन प्राइम, नेटफ्लिक्स आणि डिज्नी प्लस हॉटस्टार वीआईपी सुद्धा ह्यात तुम्ही पाहू शकता. फॅमिली प्लॅन सोबत दोन सिम कार्ड सुद्धा मोफत मिळतील.

Jio new offer

९९९ चा प्लॅन

ह्या प्लॅन मध्ये तुम्हाला २०० जिबी डाटा अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री मेसेजिंग सुविधा मिळेल. ह्यामध्ये ५०० जीबी डाटा रोल ओवर केला जाऊ शकतो. ह्या ऑफर मध्येही नेटफ्लिक्स, अमेजन प्राइम वीडियो आणि डिज्नी प्लस हॉटस्टार वीआईपी सुविधा सुद्धा मिळेल. इथे तुम्हाला तीन सिम कार्ड मोफत मिळतील.

Jio new offer

१४९९ चा प्लॅन

ह्या प्लॅन मध्ये तुम्हाला ३०० जिबी डाटा अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री मेसेजिंग सुविधा मिळेल. ह्या प्लॅन अंतर्गत तुम्ही यूएई आणि अमेरिका मध्ये अनलिमिटेड डाटा कॉलिंग मिळेल. नेटफ्लिक्स, अमेजन प्राइम वीडियो आणि डिज्नी प्लस हॉटस्टार वीआईपी सुद्धा तुम्ही पाहू शकता.

Jio new offer

ही ऑफर अजून कमिंग सून म्हणून दाखवत आहे. जर तुम्हाला ह्या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर काहीच दिवसांनी तुम्ही जियो साईट वरून किंवा नजीकच्या जियो शॉप मधून ह्या ऑफर बद्दल जाणून घेऊ शकता.

हे पण वाचा

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल