मित्रानो काही लोकांना बडीशोप खाण्याची सवय खूप जास्त असते प्रत्येक वेळी जेवणानंतर त्यांना बडीशोप खायला लागते. तर काहीजणांना ही बडीशोप खायला आवडत नाही पण खरं तर जेवणानंतर बडीशोप खाणे आपल्या शरीरासाठी उत्तम आहे यात असणारे गुणधर्म तुमच्या पोटासंबधी तक्रारी दूर करतात. जेव्हा तुम्ही घरी किंवा बाहेरच्या हॉटेल मधे तिखट अरबट चरबट खाता त्यावेळी तुम्हाला बडीशोप खाणे खूप महत्त्वाचे आणि गरजेचे असते.

त्यावेळी कधी कधी तुमचे पोटही खराब होऊ शकते. यासाठी बडीशोप खाल्याने तुमचे पोटाचे विकार होत नाहीत. जेवण चांगल्या प्रकारे पचते त्यामुळे एसिडिटी सारखा आजार तुमच्यापासून लांब राहतो. दुसरं कारण म्हणजे हॉटेल मध्ये असणारा कच्चा कांदा ह्याचा तोंडाला उग्र असा वास येत असतो. त्यामुळे कधी कधी समोरच्या व्यक्तीवर आपले वाईट इम्प्रेशन पडायला नको यासाठी बडीशोप खाल्याने आपल्या तोंडाचा वासही निघून जातो.
तसेच तुम्ही घरी ही स्वतसाठी याचा उपयोग करू शकता.
रात्री झोपण्यापूर्वी बडीशेप आणि साखर बारीक करून कोमट पाण्यासोबत घ्यावी. त्यामुळे बद्धकोष्ट आणि गॅसच्या त्रासापासून आराम मिळतो. जेवल्यानंतर बडीशेप खाल्ली तर जेवण चांगलं पचतं. काळं मीठ, जीरे, बडीशेप एकत्र चूर्ण करून घेतल्यानं कोमट पाण्यासोबत घ्यावं. पचनक्रियेसाठी हे चूर्ण उत्तम आहे. उलटीचा त्रास होत असेल तर बडीशोप खावी. तात्काळ आराम मिळतो. तोंडाला दुर्गंधी येत असेल तर कायम जवळ बडीशेप ठेवावी. बडीशेप तोंडाची दुर्गंधी घालवण्यात मदत करते.