लग्न होऊनही पाच ते सहा वर्षे झाली पण अजूनही तुम्हाला मुल होत नाही याचा अर्थ तुमच्या दोघांपैकी एकामधे नक्कीच काहीतरी प्रोब्लेम असला पाहिजे अशी शंका आपल्या आजूबाजूच्या लोकांना येते मग आपण मान खाली घालायची बस.. पण यावर काहीतरी तोडगा व्हायला पाहिजे म्हणजे नक्की काय? जर दोष हा त्या पुरुषांमध्ये असेल म्हणजे पुरुषांमध्ये शुक्राणू तयार होत नसतील तर मात्र मुल दत्तक घेणे हा पर्याय किंवा दुसऱ्या पुरुषाचे शुक्राणू हे त्या स्त्रीच्या गर्भ सोडून गर्भधारणा करणे यास आर्टीफिशियल इन्सेमिनेशन असे म्हणतात.
आता ही प्रक्रिया करण्यासाठी अगोदर काही गोष्टी तुम्ही समजून घ्या
पहिल्या प्रथम ज्या पुरुषाच्या बायकोने आपल्या नवऱ्याच्या मर्जीनुसार दुसऱ्या पुरुषाचे वीर्य आपल्या उपयोगात आणून गरोदर राहायचे ठरवले आहे. अशा नवरा बायकोने डॉक्टरांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
आता दुसरी गोष्ट म्हणजे मेडिकल एथिक्स आणि डॉक्टरांची जबाबदारी असते की ज्या पुरुषाचे वीर्य एखाद्या परक्या पुरुषाकडून घेऊन ती स्त्री गरोदर झालेली असते ही गोष्ट फक्त या तीन लोकांपूर्तीच मर्यादित राहते. आता हो तीन लोक कोण तर नवरा बायको आणि डॉक्टर म्हणजे वीर्य देणाऱ्या व्यक्तीला ही याची कोणतीच दाखल दिली जात नाही की कोणत्या स्त्रीला त्याचे वीर्य दिले आहे.
आता हे करण्यासाठी नवऱ्याच्या मनाची संपूर्ण तयारी असायला हवी त्यानंतरच पर पुरुषाचे वीर्य घेणे उचित ठरू शकेल. कारण एकदा का वीर्य घेतले आणि त्यानंतर झालेले बाळ हे माझे नाही वगैरे अशी जर त्या नवऱ्याची प्रतिक्रिया असेल तर मात्र हे करणे उचित नाही. असे केल्याने त्या बाळावर याचा वाईट परिणाम होतो. आणि म्हणून या प्रक्रियेसाठी नवरा बायको या दोघांचीही वैचारिक आणि खंबीर मनाची तयारी असायला हवी. ज्यामुळे हे बाळ येण्याने तुमच्या संसारात आनंद निर्माण होईल.
आता जे वीर्य डॉक्टर एखाद्या स्त्री साठी वापरणार आहेत ते रोगजंतू पासून आणि आजारापासून मुक्त आहेत की नाही याची खात्री असायला हवी म्हणजे ज्या पुरुषाने हे वीर्य दिले आहे ती रोगमुक्त असावा याची खात्री लॅबोरेटरीमार्फत करावी.
आता जन्माला आलेले हे मुलं काळे किंवा गोरे असणे याचा विचार करू नये. जे दिले ते गोड मानून घ्यावे मुलगा होवो किंवा मुलगी आपल्या आयुष्यात त्याच्यामुळे आनंदच येणार आहे असे मानून चालणे असे कितीतरी जोडपे आहेत ते स्वतः कितीही सदृढ असले तरी त्यांची मुलं ही काहीतरी वेगळीच होतात आणि म्हणून मुल कसेही असो आपले प्रेम त्याला द्या.