आपल्या लहान मुलाचे आपण एक वर्ष झाले की टक्कल करतो. आपण आपल्या विशिष्ट अशा धार्मिक स्थळी जाऊन आपल्या मुलाचे केस अर्पण करतो. पण बहुतेक लोकांना ह्या मागचे कारण माहीत नाहीये की नक्की हे केस का काढले जातात आणि ह्यामागे काय तथ्य असते? चला आज आपण ह्याच गोष्टीवर प्रकाश टाकूया.
डॉक्टर तुम्हाला नेहमीच तुमच्या लहान बाळाला सकाळच्या कोवळ्या उन्हात विना कपड्यात बसवण्याचा सल्ला देतात. यामागचे कारण असे की त्यामुळे त्या लहान बाळाला व्हिटॅमिन डी प्राप्त होतो. हा त्यांच्या शरीरासाठी उत्तम मानला जातो. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की मुलांची टक्कल केल्याने पुढे जाऊन त्यांच्या केसांचा योग्य विकास होतो.
हिंदू धर्मात असे मानले जाते की मनुष्य जीवन ८४ लाख योनीनंतर मिळतं. असे मानले जाते की प्रत्येक जन्मजात व्यक्तीचा त्याच्या जन्मावर एक वेगळा प्रभाव असतो. त्यामुळे लहान मुलांचे एक वर्षांनी टक्कल केल्याने मागच्या जन्मातील योनीला मुक्ती मिळते. आणि त्या लहान बाळाचा शरीर शुद्ध होतो.
काही जाणकार व्यक्ती असे सांगतात की टक्कल केल्याने त्या मुलाच्या डोक्याचा विकास उत्तमरित्या होतो. योग्य रीतिरिवाज करूनच लोक लहान मुलांचे मुंडण ह्यासाठी करतात.