Home संग्रह तुम्हीही ह्या आजी बाईबद्दल वाचले पाहिजे

तुम्हीही ह्या आजी बाईबद्दल वाचले पाहिजे

by Patiljee
486 views

घरचे जेवण जरी रुचकर असले तरी आपण बाहेरील जेवणास जास्त प्राधान्य देतो. कधी कुठे बाहेर गेलो तर हॉटेलमध्ये जाऊन मस्त ताव मारून बाहेर पडतो. पण घरच्या जेवणात आणि हॉटेलच्या जेवणात खूप फरक असला तरी आपण आवडीने हॉटेलचे जेवण जेवतो. मग ते कितीही महाग असूद्या. पण आपल्यापैकी काहींना अशीही सवय असते ती म्हणजे बाहेर हॉटेलमध्ये गेलो तरी आपल्याला घरच्या पद्धतीचे जेवण खायची ईच्छा होते. मग हॉटेल मध्ये आपण ऑर्डर करून असे जेवण जेवतो. पण अशावेळी अशा घरघुती जेवणाची मोठी किंमतही मोजावी लागते.

अशाच घरगुती पद्धतीने जेवण देणाऱ्या एका आजींची आज भेट झाली. छोट्याश्या टपरीत त्या आपले हॉटेल चालवतात. टपरी छोटी असली तरी आजींचे मन खूप मोठं आहे ह्याची जाणीव आज प्रत्यक्ष झाली. आजी पनवेल तालुक्यातील दुंदरे गावातील रहिवासी आहेत. मागील अनेक वर्षापासून त्या पनवेल येथील गुणे हॉस्पिटल जवळ आपले छोट्याश्या हॉटेलचा व्यवसाय करतात. अत्यंत कमी किमतीत सर्वांच्या खिशाला परवडेल असे जेवण ते इथे देतात.

मांसाहारी आणि शाकाहारी. अशा दोन्ही पद्धतीचे जेवण त्यांच्या ह्या हॉटेल मध्ये मिळतं. आगरी पद्धतीने बनवलेले जेवण त्यांच्या हॉटेलची खासियत आहे. ह्यात बुर्जी, वाकट्या, टेंगली सुकट, सुकट, आबांड सुकट, वजरी, बोंबील ह्यांचा समावेश आहे. आजी स्वतः शाकाहारी आहेत पण लोकांची चव त्या जाणतात. रोज त्या घरून २५० ते ३०० भाकरी बनवून घेऊन येतात. पण तरीही ह्या भाकरी कधी फस्त होतात हे कळत सुद्धा नाही. त्या आपले हे छोटेसे हॉटेल सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत चालू ठेवतात.

जनाबाई पाटील असे ह्या आजींचे नाव असून त्या नेहमीच हसतमुख असतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर एक विलक्षण आनंद आपल्याला मिळतो. त्यांना आज भेटून त्यांच्या हातचे जेऊन गावाकडची आठवण झाली. त्यांचे हे हॉटेल जरी लहान असले तरी त्यांचे मन खूप मोठं आहे हे आज आम्ही जाणले. तुम्ही जर पनवेल रहिवाशी आहात किंवा ह्या भागात येणे जाणे असेल तर आजींच्या ह्या शामियानाला एकदा आवर्जून भेट द्या.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल