नेहमीप्रमाणे आम्ही आज तुमच्यासाठी खास बातमी घेऊन आलो आहोत. आपल्या पेजवर नेहमीच तुम्ही काही ना काही नवीन वाचत असता. तुम्ही जेव्हा घर विकत घ्यायला जाता तेव्हा सर्वप्रथम काय अपेक्षा असतात तुमच्या की तुमच्या घराजवळ सर्व सोई सुविधा आहेत की नाहीत? आपण तरी हेच पाहणार पण असं एक घर आहे जो पाहिल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही की या घराचे कितीही मोठ्या धोक्यापासून रक्षण होऊ शकेल. तर आज आपण याच घराबाबत बोलणार आहोत.

पोलंडची राजधानी वारसॉ मध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने हे घर बनवले आहे आणि हे घर खूप सुरक्षित सुद्धा आहे. हे घर बनवण्यासाठी पोलंडच्या फेमस आर्किटेक्चर फर्म केडब्ल्यूके प्रोम्स याच्याशी संपर्क साधण्यात आला आणि त्याला जास्तीत जास्त सुरक्षित घर बनवायला सांगितले आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे कंपनीने इतके सुरक्षित घर बनवला की ते घर बघून प्रत्येक जण आश्चर्यचकित झाले आहे. या घातला जगातील सर्वात सुरक्षित घर म्हणून गौरविण्यात आले आहे. या घराची खास गोष्ट अशी आहे की एक बटण दाबताच त्या घराभोवती सगळ्या बाजूंनी भिंती तयार होतात त्यानंतर हा घर एखाद्या बंद गोडाऊन सारखा वाटतो.
जेव्हा हे घर अशा रीतीने बंद होते तेव्हा कितीही प्रयत्न करा कोणीच त्या घरात घुसू शकत नाही. अशावेळी घरात जाण्यासाठी एकच रस्ता उरतो तो म्हणजे दुसऱ्या मजल्यावरील पुलाचा उपयोग करूनच या घरात प्रवेश करू शकता आणि हे सुध्दा त्या घरातील मालकाच्या होकारानेच होऊ शकते. कंपनीच्या सांगण्यानुसार जेव्हा घर पूर्णपणे भिंतींनी वेधले जाईल तेव्हा या घरावर कितीही मोठे संकट आले तरीही काहीच परिणाम होणार नाही घराच्या आतमध्ये स्विमिंग पुल ही बनवण्यात आले आहे शिवाय आतून खूप सुंदर असे हे घर आहे.