आज बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारे इरफान खान आज मात्र सर्वांना रडवून गेले. त्यांच्या निधनाने सर्वांना मोठा झटका बसला आहे. मंगळवारी त्यांची तब्बेत ठीक नसल्याने त्याला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्याची परिस्थिती कशामुळे बिघडली होती हे अजुन त्यांच्या घरातून किंवा डॉक्टरांकडून सांगण्यात आलं नाहीये.
५४ वर्षीय इरफान खान ह्यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर होता. परदेशात त्यांनी ह्या रोगावर इलाज केला होता. काहीच दिवसापूर्वी त्यांनी इंग्लिश मिडीयम सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण केले होते. ह्या सिनेमाच्या शूट वेळी सुद्धा त्यांची तब्बेत अनेक वेळा खालावली होती. अशात वेळी बऱ्याचदा शूट थांबवण्यात आले होते.
मंगळवारी त्यांनी हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर त्यांची स्थिती स्थिर आहे असे सांगण्यात आलं होत. पण आज आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि सर्व कडे शोककळा पसरली आहे. एक हूरहुंनरी अभिनेत्याची अशी अचानक एक्झिट मनाला चटका लाऊन देणारी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
आपण आजवर त्यांचे अनेक सिनेमे पाहिले असेल. त्यांनी अभिनय केलेला कोणता सिनेमा तुम्हाला जास्त आवडला होता? त्यांच्या स्मरणार्थ काही दोन शब्द नक्की कमेंट मध्ये लिहा.