Home खेळ/Sports आयपीएल मध्ये झाली ह्या दोन भावांची एन्ट्री, मोठा मुंबई इंडियन्स तर छोटा पंजाब संघात खेळणार

आयपीएल मध्ये झाली ह्या दोन भावांची एन्ट्री, मोठा मुंबई इंडियन्स तर छोटा पंजाब संघात खेळणार

by Patiljee
111 views

टी ट्वेण्टी मधील मधील सर्वात मोठी लीग म्हणून आयपीएलची ओळख आहे. ह्या लीगने आजवर अनेकांना रातोरात करोडपती केले तर अनेक खेळाडूंची करीयर घडवली. आयपीएल ने आपल्या भारतीय क्रिकेटला काय दिले तर आपण आवर्जून नमूद करून सांगू की चांगले खेळाडू दिले. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या सारखे फलंदाज आयपीएल मुले भारतीय संघात येऊ शकले. पांड्या ब्रदर आणि चहर ब्रदर सुद्धा आयपीएल मुळेच इंटरनॅशनल संघात खेळू शकले.

पांड्या आणि चहर ब्रदर ह्यांनी जसे आयपीएल मध्ये नाव कमावले आहे तशाच प्रकारे २०२० च्या मौसमात आणखी एक भावांची जोडी तुम्हाला मैदानात दिसणार आहे. ज्या प्रकारे हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि चहर ब्रदर ने आपल्या चांगल्या खेळाने भारतीय संघात प्रवेश मिळवला त्याच प्रकारे हे दोन भाऊ देखील आपल्याला इंटरनॅशनल संघात दिसतील ह्याची शंका वर्तवली जात आहे. आम्ही बोलत आहोत पंजाबच्या दोन भावांबद्दल. जिथे मोठा भाऊ मुंबई इंडियन्स संघात तर छोटा किंग्ज इलेवेन पंजाब संघात तुम्हाला खेळताना दिसेल.

Source Anmol Social Handle

अनमोलप्रीत सिंह आणि प्रभसिमरन सिंह अशी ह्या दोन भावांची नावे आहेत. मागील वर्षी प्रभसिमरन पंजाब संघाकडून खेळताना आपले आयपीएल पदार्पण केले आहे. अनमोलप्रीत सिंह अजुन आयपीएल मध्ये एकही सामना खेळला नाहीये. त्याला आपल्या पहिल्या सामन्याची आतुरता असेलच. मागच्या वर्षी अनमोलप्रीत ह्याला मुंबई इंडियन्स संघाने ८० लाख देऊन विकत घेतलं होत. त्यामुळे येणाऱ्या आयपीएल मध्ये ह्या दोन भावांवर सर्वांची नजर असणार ह्यात काही शंका नाही.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल