वाढत्या काळानुसार प्रत्येक गोष्ट सुद्धा बदलत चालली आहे. जसे मनुष्याला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा गरजेचं आहे तसेच हे सर्व मिळवण्यासाठी शिक्षण सुद्धा तेवढेच गरजेचं आहे. तुम्ही जर एका पाल्ल्याचे पालक असणार तर ही बातमी तुम्हाला चांगलीच जवळची वाटेल. मुलांना शिक्षणासाठी वेगवेगळे क्षेत्र उघडले असतील तरी त्या शिक्षणाची फिस एवढ्या जास्त प्रमाणात वाढली आहे की ती प्रत्येकाला परवडणारी नाहीच. प्रत्येक शाळेचा विचार केलात तर वेगवेगळी फीस तुम्हाला आकारण्यात येते. आज आम्ही तुम्हाला अशा एका शाळेबद्दल सांगणार आहोत ज्याची फिस् बघून तुम्हाला धक्का बसेल. सगळ्यात महाग शाळा म्हणून ही ओळखली जाते.
आज आम्ही तुम्हाला मुकेश अंबानी ह्यांच्या शाळेबद्दल सांगणार आहोत. ह्या शाळेत मिडल क्लास माणूस आपल्या मुलाला शिकवण्याचा विचार स्वप्नात सुद्धा करू शकत नाही. ह्या शाळेत एडमिशन घेण्यासाठी २४००००० किँमत आकारली जाते. नंतर प्रत्येक वर्षाचे वेगळे फीस भरावी लागते. एलकेजी पासून ते पाचवी इयत्ते पर्यंत एक लाख चाळीस हजार रुपये वर्षाला भरावे लागतात. आठवी ते दहावी इयत्तेतील मुलांसाठी ही फीस एक लाख ८५ हजार एवढी आहे. आईजीसीएसई बोर्डसाठी ४ लाख ४८ हजार एवढी वार्षिक फीस आहे.

ह्या शाळेत अभिनेता अभिनेत्री राजकारणी आणि इतर श्रीमंत लोकांची मुले जास्त प्रमाणात आढळून येतात. अजुन वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स आणि त्यांचे फीस सुद्धा त्यांच्याकडे आहेत. म्हणून ह्या शाळेला भारतातील सर्वात महाग शाळा म्हणून ओळखले जाते.