भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे जाणें लोकांना आवडत आहे पण भारतात अशी काही ठिकाणे देखील आहेत जिथे जाणें म्हणजे आपल्या जिवाला धोका आहे अशी काही ठिकाणी आजच्या लेखात आपण आज सांगणार आहोत.
1. कलावंतीण दुर्ग
महाराष्ट्र राज्यात ही सर्वात खतरनाक ट्रेक आहे जी 2300 फूट उंचीवर असणाऱ्या किल्ल्यावर पाणी आणि वीजही नाही अशा ठिकाणी आहे. हा किल्ला मुंबई पुणे या रुटला आहे प्रभलगढ किल्ल्या जवळ ज्याला कलावंती दुर्ग असे म्हणतात. या किल्ल्यावर चढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. कारण हा भाग संपूर्ण दगडाला कापून बनवलेला आहे त्यामुळे येथील शिड्या सुध्दा वाकड्या तिकद्या आहेत. जितके या किल्ल्यावर चढणे कठीण तितकेच उतरणे ही खूप कठीण आहे. पनवेल स्टेशनला उतरून तिथून ठाकूरवाडी बस किंवा रिक्षा पकडून तुम्ही थेट त्या ठिकाणी जाऊ शकता तिथे तुम्हाला ट्रेकिंग चे सामान उपलब्ध होईल.

2. धनुषकोडी रामेश्वर बेट
धनुषकोडी समुद्र तट हा बंगाल आणि हिंद महासागर या दोन्ही महासागरांच्या खड्यांच्या मधे आहे. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी कितीतरी लोक राहत होती पण आता ही जागा एक प्रकारची भीतीदायक शांतता दाखवते. दिवसा या ठिकाणी खूप लोक फिरायला जातात पण एकदा का रात्र झाली की इथल्या फिरायला आलेल्या लोकांना पुन्हा परत पाठवले जाते. कारण रात्री इथे फिरणे धोक्याचे असते म्हणून. तुम्हाला माहीतच असेल 1964 ला झालेला चक्रीवादळ यामुळे याठिकाणी असणारे सगळे काही उध्दवस्त झाले होते. शिवाय एक प्रवाशांची रेल्वे ट्रेन ही समुद्राच्या पाण्यात बुडाली आणि तिथपासून ही जागा निर्जन आहे. शिवाय हे ही सांगतात की रात्री येथे जो व्यक्ती राहिला तो पुन्हा परत आला नाही.

3. रूपकुंड जिसे तलाव
या तलावाच्या किनाऱ्या लगत पहिल्या जाणाऱ्या मनुष्य हाडांचे सांगाडे यामुळे हे तलाव एक खतरनाक तलाव म्हणून ओळखले जाते. या तलावाला येथील राहणारी लोक भुतांचा तलाव असे म्हणतात. कारण या तलावात फक्त मनुष्याची हाडे बघायला मिळतात. या तलाव संदर्भात हे हाडांचे सांगाडे मिळण्याबाबत अनेक संशोधनाने आपापली मते मांडली आहेत. कोणी सांगितले की महामारी मुळे तर कोणी बर्फाचे तुफान यामुळे ही मानवी हाडे सापडली जातात असे सांगण्यात आले आहे. तर तेथील रहिवाशी नंदा नदीचा प्रकोप झाल्यामुळे हे होत आहे असे मानत आहेत.