मित्रानो या जगात अशी काही लोक आहेत ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य असते ते सर्वानाच जमत नाही तर ते फक्त त्याच लोकांना येते कारण त्यांनी यासाठी जीवतोड मेहनत घेतलेली असते. असेच नाही कोणी आला गेला हे काम करू शकतो आणि म्हणून आज आपण असे व्यक्ती वच् पाहणार आहोत ज्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव कमावले आहे.
कारच्या खाली स्केटिंग
महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर येथील ही मुलगी तीच नाव आहे श्रेया राकेश देशपांडे. हिने आपल्या नावे हा रेकॉर्ड केला आहे. स्केटिंग करणे तसे सर्वानाच जमत नाही पण या मुलीने स्केटिंग ही चक्क कारच्या खालून केली आहे. हिने 27 गाड्यांच्या खालून फक्त 23 सेकंदात स्केटिंग केली आहे.
जगातील सर्वात मोठी मिशी
जयपूर मध्ये राहणाऱ्या रामसिंह चौहान यांच्याजवळ आहे जगातील सर्वात लांब मिशी, त्या मिशीची लांबी आहे सुमारे 14 फूट इतकी आहे. त्यांच वय आता 58 वर्ष आहे पण त्यांनी जवळ जवळ 32 वर्ष मेहनत घेऊन इतकी लांब मिशी बनवली आहे ते आपल्या मिशीचि खूप काळजी घेतात.
जलद टायपिंग करणे
दिल्ली मध्ये राहणारा हा व्यक्ती विनोद कुमार चौधरी याने आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये कमावले आहे. टायपिंग तर बहुतेक जण करतातच आणि फास्ट ही करतात मग याने काय नवल केले तर टायपिंग ही हाताने न करता आपल्या नाकाने केली आहे खूप कठीण काम आहे त्याने 46 सेंकडामधे 103 बटण टाईप केली आहेत.
पारंपरिक नृत्य
हिमाचल प्रदेशातील लोकांनी हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. रेकॉर्ड मध्ये 9892 इतक्या संख्यानी महिलांचा समावेश होता. त्यांनी मिळून आपला ट्रेडिशनल नृत्य केलं होतं. हा विक्रम त्यांनी दसऱ्याच्या दिवशी केला होता.
एकत्र योगा करणे
21 जून या दिवशी योगा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हाच दिवस घेऊन मोदींनी हा रेकॉर्ड केला आहे. यात खूप लोकांना एकत्र केले होते. मोदींनी यासाठी 84 देशातील लोकांसोबत 35985 लोकांना एकत्र घेऊन योगा केला आहे.
जगातील सर्वात महाग कपडे
भारतीय प्रधान मंत्री मोदी यांच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. 2015 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यासोबत मोदींची मीटिंग होती. त्यावेळी हा सुट त्यांनी घातला होता. तस बघायला गेलो तर याची किंमत काही लाख होती पण जेव्हा सूटचा लिलाव झाला तेव्हा त्याची किंमत 4 करोड 31 लाख रुपयेला हा खरेदी करण्यात आला. हा सूट गुजरातमधील एका व्यापाऱ्याने खरेदी केला होता.
सगळ्यात मोठी चपाती
जगातील सर्वात मोठी चपाती बनवण्याचा रेकॉर्ड बनवला आहे गुजरात मधील जलरांम मंदिर देव स्थानाने. मंदिरच्या जलराम समितीने 135 किलोची चपाती बनवली होती. ही चपाती एका सार्वजनिक महोत्सव साठी बनवली गेली होती.
मेंदूचा कॅल्क्युलेटर
हा रेकॉर्ड करणारी भारतीय महिला म्हणजे शकुंतला देवी होय. तिला कॉम्प्युटर हे नाव ही देण्यात आले आहे. कारण तो गणित काही क्षणात सोडवते कोणतेही गणित असो त्याच्याकडे तिचे उत्तर नक्की असते. याच तिच्यातील कौशल्याने तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लीहले गेले आहे.
सगळ्यात छोटी महिला
नागपूर मध्ये राहणारी ही सर्वात छोटी महिला हिचे नाव आहे ज्योती आमगे. हीच वय आहे 25 वर्ष आहे तिची उंची फक्त 63 सेंटिमीटर इतकी आहे. तिचे वजन फक्त 5 किलो आहे 2011 का तिच्या नावाने हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे.
सगळ्यात मोठी पगडी
पटियाला मधील अवतार सिंग मोनी यांचे नाव ही याकरिता गिनीज बुक मध्ये नोंदवले आहे. अवतार सिंग यांच्या पागडीचा वजन 100 पौंड पेक्षा ही जास्त आहे आणि तिची लांबी आहे 635 मिटर इतकी. ही पगडी बांधण्यासाठी जवळ जवळ 6 तास लागतात.