२०२० हे वर्ष आजपर्यतचे सर्वात वाईट वर्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. ह्या वर्षात देशाने अनेक संकटाना सामोरे जावे लागले आहे. कोरोना सारख्या विषाणू ने संपूर्ण जगच लॉक डाऊन केलं आहे. बॉलीवूड साठी सुद्धा हे वर्ष अतिशय दुःखद मानले जात आहे. लॉक डाऊन मुळे शूटिंग बंद असल्याने नुकसान तर होतच होते पण पहिल्यांदा एकाच वर्षात अनेक कलाकारांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. मागील ३८ दिवसात १२ असे कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत ज्यांचे दुःख आपण पचवू शकणार नाहीत.
इरफान खान
२९ एप्रिल रोजी इरफान खान ह्यांच्या निधनाची बातमी पसरताच सर्वकडे दुःखाची लाट पसरली. त्यांचे असे आकस्मात काळाच्या पडद्याआड जाणे खूपच निराशाजनक होते. बरेच वर्ष ते कॅन्सरने ग्रस्त होते.
ऋषी कपूर
इरफान खान ह्यांचे जाने लोक पचवू ही शकले नव्हते तेव्हाच दोन दिवसात म्हणजेच ३० एप्रिलला ऋषी कपूर ह्यांच्या निधनाची बातमी समोर आली.
वाजिद खान
आपल्या संगीताने अनेकांना मंत्रमुग्ध करणारे वाजिद खान ह्यांचे निधन सुद्धा १ जून रोजी झाले. त्यांना किडणीचा आजार होता.
योगेश गौर
बॉलीवूड सिनेमात नेहमीच आपल्या गाण्यांनी ओळखले जाणारे योगेश गौर हे गीतकार आपल्याला २९ मे रोजी सोडून गेले.
मोहित बघेल
२७ वर्षात मोहित बघेल ह्याने रेडी सिनेमात आपल्याला खदखदून हसवले होते. पण अनेक वर्ष तो सुद्धा कॅन्सर ने ग्रस्त होता. २३ तारखेला त्याचे सुद्धा निधन झाले.
मनमीत ग्रेवाल
टेलिव्हिजन क्षेत्रातील मनमित ग्रेवा ल ने आपल्या राहत्या घरी २३ मे रोजी आत्महत्या केली होती.
अभिजित
शाहरुख खानच्या रेड चिली कंपनी मध्ये काम करणारे अभिजित ह्यांचं सुध्दा निधन झालं आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झाले नाहीये.
सचिन कुमार
अक्षय कुमार ह्याचा चुलत भाऊ आणि टेलिव्हिजन मध्ये काम करणाऱ्या सचिन कुमार ह्याचे हृदयविकाराचा झटका येऊन १५ मे रोजी निधन झालं.
आमोस
आमिर खान ह्याचा पर्सनल असिस्टंट आमोस ह्याचा मृत्यू १२ मे रोजी झाला होता. आमिर खान स्वतः जाऊन त्याच्या अंत विधीला उपस्थित होता.
साई गुंडेवर
आमिर खानच्या पिके सिनेमात काम केलेलाला साई गुंडेवर ह्याचे सुद्धा १० मे ला निधन झाले. त्याला ब्रेन कॅन्सर होता.
शफिक अंसारी
अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसणारे शफीक अंसारी ह्याचा सुद्धा १० मे रोजी निधन झाले. क्राईम पेट्रोलच्या अनेक एपिसोड मध्ये त्यांनी पोलिस आणि अन्य भूमिका केल्या होत्या.
प्रेक्षा मेहता
वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी प्रेक्षाने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. ती बऱ्याच वेळेपासून डिप्रेशन मध्ये होती. अनेक मालिका आणि क्राईम पेट्रोलच्या एपिसोड मध्ये ती दिसली होती.