या धरतीवर प्रत्येक माणूस हा जेव्हा जन्माला येतो त्याच्या जन्म दिवसापासून त्या मनुष्याची कुंडली काढली जाते आणि त्या कुंडलीमध्ये त्या माणसाचा जन्म हा कोणत्या गणात झाला आहे हे आपल्याला समजते. एकूण तीन गण असतात. जोतिष शास्त्रानुसार माणसाची वर्गवारी ही तीन गणांमधे झालेली असते. माणसाचे गण त्याचे स्वभाव आणि चरित्र ठरवत असते. देव गण, मनुष्य गण आणि राक्षस गण हे तीन गण आहेत. पण आपल्याला यांपैकी एक गण असतो तो कोणता हे आपल्याला माहीतच असेल पण या गणांबद्दल काही लोकांच्या मनात फार शंका असतात त्याचे निराकरण आज आपण करणार आहोत.
तसेच लग्न जमताना ही नवऱ्याची आणि नवऱ्याची जन्म पत्रिका ही बघितली जाते जेणेकरून त्यांच्या पुढील आयुष्यात कोणतेही संकट यायला नको.
देव गण
तीन गणांपैकी हा सर्वात श्रेष्ठ गण मनाला जातो. जोतिष शास्त्रानुसार या नक्षत्रामध्ये जन्माला आलेले व्यक्ती हे स्वभावाने देवा सारखे असतात त्यांचा स्वभाव उदार, साहसी बुद्धिवान असतो. शिवाय अशा लोकांना दान धर्म करण्याची खूप सवय असतें, इतरांच्या मदतीला धाऊन जाणारे तसेच गरजवंताला मदत करणारे हे लोक असतात. अश्विनी, मृगशिरा, पुर्नवासु, पुष्य, हस्त, स्वाति, अनुराधा, श्रावण, रेवती या नक्षत्रात जन्मंनारे लोक हे देव गणातील असतात.
राक्षस गण
राक्षस म्हटल्यावर लोक लगेच घाबरायला लागतात की हा गण खूप खतरनाक आहे वगैरे पण मुळात तसे काही असते का, हे कोणाला माहित नसते. आश्लेषा, विशाखा, कृत्तिका, मघा, ज्येष्ठा, मूल, धनिष्ठा, शतभिषा नक्षत्रात जन्म घेणारे लोक राक्षस गणाचे असतात. राक्षस गण असणारा माणूस याला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नकारात्मक शक्ती यांची जाणीव लगेच होते ते खूप साहसी, धाडशी आणि त्यांची इच्छा शक्ती खूप मजबूत असते.
मनुष्य गण
या नक्षत्रामध्ये जन्माला येणारे व्यक्ती हे आपल्या आजूबाजूला असणारी नकारात्मक आणि सकारात्मक या दोन्ही प्रकारच्या शक्ती त्यांना लगेच ओळखू येतात. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या ऊर्जा किंवा काही अपघात झालेले असतील अशा ठिकाणी हे लोक गेल्यावर त्यांचं मन चलबिचल होत. याशिवाय सकारात्मक शक्तीलाही ते लगेच समजू शकतात दैविय शक्ती त्यांच्या आजूबाजूला असल्यास त्यांना लगेच समजते.