Home संग्रह नवजात बाळाने आपले पहिलं पाऊल आपल्याच देशाच्या मातीवर ठेवण्यासाठी ह्या सैनिकाने केलं असं काही

नवजात बाळाने आपले पहिलं पाऊल आपल्याच देशाच्या मातीवर ठेवण्यासाठी ह्या सैनिकाने केलं असं काही

by Patiljee
257 views

देश रक्षणासाठी प्रत्येक सैनिक आपले कुटुंब सोडून पोस्टिंग असेल तिथे राहतो. आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणारे सैनानी आपल्या देशाच्या मातीबद्दल काय विचार करत असतील हे आपल्याला वेगळे सांगायची गरज नाही. आपण सर्व आपल्या घरात मस्त बेडवर सुखरूप झोपत असलो तरी हे शक्य होत फक्त बॉर्डरवर असणाऱ्या सैनिकांमुले. रात्रंदिवस ते तिथे पहारा देत असतात म्हणून आपण शांत झोपी जाऊ शकतो. आज आम्ही अशाच एका सैनिकाबद्दल सांगणार आहोत ज्याने असे काही काम केलं आहे की कुणी त्याचा विचारही करू शकत नाही.

अमेरिका आर्मी मध्ये असलेले टोनी ट्रेकोनी ह्यांची एक इच्छा होती की त्याला झालेल्या अपत्याने आपले पहिले पाऊल आपल्या मातृभूमीच्या मातीवर ठेवावे. टोनीची पोस्टिंग जेव्हा इटली मध्ये पडूवा प्रांतात होती तेव्हा त्याची पत्नी गरोदर होती. त्याला असे वाटत होते की मुलाच्या जन्माच्या अगोदर मी माझ्या देशात परतेल. पण असे काही होऊ शकले नाही म्हणून त्याने एक महिन्या अगोदरच आपल्या टेक्सास ह्या शहरातून मातृभूमीची नाती इटली मध्ये मागवली.

त्याची एकच इच्छा होती की जेव्हा माझे बाळ ह्या जगात येईल तेव्हा त्याने त्याचे पहिले पाऊल आपल्याच देशाच्या मातीवर टाकावे. जिथे त्याची आई वडील लहानाचे मोठे झालेत. ही माती मागवण्यासाठी त्याने आपल्या आई बाबांची मदत घेतली आणि ती माती एका कंटेनर मध्ये भरून इटली मध्ये पाठवण्यात आली. ह्या सर्वासाठी त्याला २०० डॉलर म्हणजेच कमीतकमी १४००० हजार खर्च आला.

Source Toni Traconi Social Handle

जेव्हा त्या बाळाचा जन्म झाला तेव्हा ती माती बेडखाली ठेवण्यात आली आणि त्याच्या मनात जे होत तेच झाले. त्याच्या मुलाने आपले पहिले पाऊल स्वतःच्या देशाच्या मातीवर ठेवले. त्यांनी ही माती आजही जपून ठेवली आहे. एक गोड आणि मनाला सुखद करणारी ही माती तो नेहमीच आपल्या जवळ ठेवेल असे त्याचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल