तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कोणकोणते असे नेते आहेत ज्यांनी आपल्या मुलाला सैनिकात भरती केले आहे. खर तर ही त्या नेत्यांसाठी आणि आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे कारण आजच्या काळात कोणता असा पुढारलेला नेता आपल्या मुलाला सैन्यात पाठवेल. कारण दहा पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती आज त्याच्याजवळ असते आणि म्हणून त्यांच्या मुलांना पैसे कमवण्याची मुलीचं गरज नसते याविरुद्ध जाऊन या नेत्यांनी आपल्या मुलांना सैन्यात भरती केले आहे आणि तिथे ते नोकरी करत आहेत.
अनुराग ठाकुर
तुम्हाला हे माहित आहे का हिमाचल प्रदेशातील पूर्व मुख्यमंत्री कुमार धुमल यांचा मुलगा अनुराग ठाकुर याने सैन्यात भरती होण्यासाठी एक मोठी कॉर्पोरेट कंपनी येथील जॉब सोडून दिला आणि म्हणून आता हा अनुराग ठाकूर क्षेत्रीय सेना मध्ये लेफ्टिनेंटच्या पदावर आपले काम करत आहेत.

श्रेयशी पोखरियाल
तुम्हाला माहीत आहे का की उत्तराखंड मधील विधायक रमेश पोखरियाल यांची मुलगी श्रेयशी पोखरियाल हिला अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब ची ऑफर आली होती आणि ही ऑफर लाथाडून श्रेयशी ही भारतीय सैन्यदलात भरती झाली.

नमिता पंत
पूर्व अर्थ मंत्री प्रकाश पंत हे तुम्हाला माहीतच असतील यांच्या मुलीचं नाव आहे नमिता पंत हिने वकिली केली होती पण तिने वकील किंवा अन्य कोणताच पेशा न स्वीकारता तिने भारतीय सेना दलात जाण्याची आपली पसंती दर्शवली आणि तिच्या मनासारखे झाले.

आपल्याला नक्कीच ह्या तीन व्यक्तिमत्त्वाचा अभिमान असला पाहिजे.