मित्रानो तुम्हाला माहीत असेल की बॉलिवूड मधील कित्तेक असे जोडीदार आहेत जे आज लग्न करून आपला संसार करत आहेत. शिवाय असेही काही जोडपे आहेत त्यांचे प्रेम तर झाले पण काही कारणामुळे लग्न होऊ शकले नाही. तर आज आपण पाहणार आहोत ज्यांचे प्रेम हे सिनेमाची शूटिंग दरम्यान झाले.
अजय देवगण आणि काजोल
अजय आणि काजोल ही जोडी सर्वच रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. या दोघांची ओळख हलचल या पहिल्या सिनेमात झाली पण दोघंही एकमेकांशी फक्त कामापुरते बोलायचे त्यानंतर दोघांचे चित्रपट येत गेले आणि हळू हळू याचे ही प्रेम बहरत आले या दोघांचे लग्न होऊन आता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. बऱ्याच वर्षानंतर दोघेही तान्हाजी ह्या चित्रपटात आपल्याला एकत्र दिसणार आहेत.
सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे
सुनील शेट्टी आणि सोनाली या दोघांचे ही प्रेम हे सिनेमाच्या शूटिंग दरम्यान झाले होते पण सुनील शेट्टी हा अगोदरच लग्न झालेलं होता त्यामुळे या दोघांचे लग्न नाही होऊ शकले शिवाय त्यांच्या प्रेमाला ही पूर्णविराम लागला.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय
अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांची जोडी मधील प्रेम हे चित्रपट बंटी आणि बबली यंदर्म्यांन असणारे गाणे कजरारे या गाण्याच्या शूटिंग दरम्यान झाले. या गाण्याच्या शूटिंग दरम्यान दोघांनी एकमेकांना आपले हृदय दिले होते. त्यानंतर दोघांनी घरातल्यांच्या संमतीने लग्नही केले.
ऋतिक रोशन आणि करीना कपूर
हृतिक आणि करीना या दोघांच्या प्रेमाला सुरुवात मैं प्रेम की दीवानी हूं या सिनेमातून झाली होती त्याचप्रमाणे मीडियाने ही यांच्याबद्दल भरपूर अशा बातम्या लोकांसमोर आणल्या होत्या पण जितक्या लगेच त्याचे प्रेम झाले होते तितकाच कालावधी त्याच्या ब्रेकअपही झाला.
जेनेलिया डिसूजा आणि रितेश देशमुख
जेनेलिया आणि रितेश या दोघांचा पहिला वाहिला सिनेमा तुझे मेरी कसम या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दोघं खूप जवळ आली होती त्यानंतर दोघांनी कधीच मागे पाहिले नाही आणि आपल्या प्रेमाला लग्नाचा पूर्णविराम दिला.
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण
रणवीर आणि दीपिका ची जोडी आजपर्यंत सगळ्या प्रेक्षकांना आवडली त्या दोघांनी खूप सारे चित्रपट केले पण गोलियों की रासलीला रामलीला या चित्रपटा दरम्यान ह्या दोघांमध्ये कधी जुळले ते कळलेच नाही. शेवटी 2018 का ते दोघं लग्नाच्या बेडीत अडकले