इंडियन आर्मी नेहमीच संकट आले की धावून येते हे आपल्याला माहितीच आहे. अशीच काहीशी घटना बिजापूर मध्ये घडली. छत्तीसगड मधील बिजापूर भागात सहा किलो मीटरचा रस्ता पायी तुडवत एका गर्भवती महिलेला आपल्या खांद्यावर उचलून जवानांनी दवाखान्यात पोहचवले. CRPF ची एक टीम ह्या भागात पेट्रोलिंग करत असताना एक महिला त्यांना दिसली जी गरोदर होती आणि प्रसूतीच्या वेदना देत होती. आजूबाजूला जवानांनी मदतीसाठी प्रयत्न केले पण काहीच हाती लागले नाही.
शेवटी CRPF जवानांनी त्या महिलेला खांद्यावर घेऊन सहा किलो मीटरचा प्रवास करून रुग्णवाहिके पर्यंत पोहोचले. तिथून त्या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीच्या अनुसार त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे आणि आई बाळ दोघांचीही तब्बेत ठीक आहे.
CRPF जवानांच्या ह्या कामगिरीमुळे त्यांच्यावर शुभेच्छाचां वर्षाव होत आहे. जेव्हापासून वरील फोटो पोस्ट करण्यात आला आहे तेव्हापासून हा फोटो सोशल मीडियावर सर्व लोक शेअर करत आहेत. काही दिवसापूर्वी तिथल्याच बुडगीचेरु ह्या गावातील एका युवकाला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात नेण्यासाठी तेव्हाही CRPF जवानांनी त्या युवकाला खांद्यावर उचलून पाच किलो मीटरचा पल्ला गाठला होता.