Home हेल्थ ह्या गोष्टीपासून लांब राहिलात तर १०० वर्ष अधिक जीवन जगाल

ह्या गोष्टीपासून लांब राहिलात तर १०० वर्ष अधिक जीवन जगाल

by Patiljee
908 views

मित्रानो आजचा काळ हा खूप फास्टफोरवर्ड होत चालला आहे या काळात कुणालाही इतका वेळ नसतो की आपण जे खातो किंवा ज्या वस्तू आपण वापरतो ते चांगले खातो की वाईट याचाही विचार करत नाहीत आणि म्हणून आजच्या काळात लोक जास्त आजारी पडायला लागली आहेत. रोगराई जास्त वाढत चालली आहे दुकानात जे विकायला असते ते आपण दिसायला चांगले म्हणून विकत घेत असतो आणि त्याचे सेवन करत असतो किंवा त्याचा उपयोग करत असतो पण हे जे आपण विकत घेत असतो ते प्रॉडक्ट आपल्या शरीरासाठी खरंच चांगले आहेत का याची शहानिशा कोणीही करत नाही. तर चला आज आपण पाहूया असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्ल्याने तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकतात.

ह्या वस्तू अशा आहेत ज्याच्या पासून कदाचित तुमचा रोजच्या दिवसाची सुरुवात ही होत नसेल पण जेव्हा हा लेख वाचाल तेव्हा कदाचित या वस्तूपासून तुम्ही लांब राहण्याचा प्रयत्न तरी कराल.

सिगारेट
प्रत्येक सिगारेटच्या पॅकेटवर हे लिहलेले असते धूम्रपान करणे हे तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते. कारण सिगारेट मध्ये जी तंबाखू भरतात त्याच्यामुळे तुमच्या शरीराला हे नुकसान होत असतात. पण खरी गोष्ट अशी आहे की तंबाखू ऐवजी यामध्ये 600 असे घटक असतात जे तुमच्या शरीरासाठी तंबाखू पेक्षाही जास्त घातक ठरतात. ज्यातील एक पदार्थ आहे एशिटोन जो नेलपॉलिस रिमोवर बनवण्यासाठी वापरतात. दुसरा आहे आर्सेनिक जो उंदीर मारायच्या औषधामध्ये मिसळला जातो. बुटेन ज्या च्या पासून लाइटरचा लिक्वीड बनवला जातो. कॅरबियम जो बॅटरी मधील असणारा अॅसिड बनवण्यासाठी वापरला जातो आणि साईनाईड जो मानवी विष यामध्ये वापरला जातो.

परफ्यूम
आताच्या काळात परफ्यूम अंगावर मारणे लोकांना जास्त गरजेचे वाटते आहे. तुम्ही परफ्यूम वापरताना स्वस्त वापरा किंवा महाग एकच आहे तसे पाहिले तर सर्वात महाग परफ्यूम हा सगळ्यात घाणेरड्या वस्तूंपासून बनवला जातो. काही प्राण्यांचे सुवासिक अवयव यामध्ये वापरले जातात.

बटाट्याचे वेफर्स
बटाट्याचे वेफर्स सगळ्यांनाच खायला आवडतात पण काही लोक हेल्थ साठी घातक म्हणून ते खाणे टाळतात पण तेलकट असतात म्हणून त्यांना ते घातक वाटतात पण महत्त्वाचे म्हणजे यामध्ये सोडियम बाय सल्फाईड हा घटक असतो तर हा पदार्थ काही फूड प्रीजवेर्टिव म्हणून नाही वापरत तर अँटी फंगल म्हणून वापरता ज्यामुळे यामुळे वेफर्सचा रंग आणि त्याचे फंगल पासून रक्षण होण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि हा आपल्या शरीरासाठी घातक असा पदार्थ आहे.

ब्रेड
बाहेर विकत मिळणारा ब्रेड हा व्हाईट असो किंवा मल्टी ग्रेन हे दोन्ही तुमच्या शरीरासाठी घातक आहेत. कारण ब्रेड ला सॉफ्ट करण्यासाठी एकप्रकारचा कंडीशनर वापरण्यात येतो. जो मानवी कापलेल्या केसांपासून आणि बदकांच्या पखांपासून बनवलेला असतो. आणि म्हणून तुम्ही जे बाहेरून विकत घेता त्या ब्रेड मध्ये हा पदार्थ नक्कीच असतो.

जेली
जेली आपण आपल्या लहान मुलांना नेहमी देत असतो. हे पदार्थ बनवल्यासाठी जेलेटीनचा उपयोग केला जातो. तर तुम्हाला माहीत आहे का हे जेलेटिन कसं बनत तर जनावरांची कातडी, हाडे हे पाण्यात तासनतास उकळऊन घेतात त्यानंतर पाण्यावर एकप्रकारचा तवंग येतो. हाच तुमचा जेलेटीन असतो.

तर असे भरपूर पदार्थ आहेत ज्यामध्ये अशा प्रकारचे आपल्या शरीरासाठी घातक असणारे घटक असतात पण आज आपण या इतक्यात पदार्थांबद्दल लिहले आहे पण शक्य झाल्यास अजुन पुढे लीहण्याचा प्रयत्न करू.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल