तर आपण ज्या व्यक्तीची आज सांगणार आहोत त्या व्यक्तीचे नाव आहे आयुष्मान खुराणा होय. अपारशक्ति हा त्याचा लहान भाऊ आहे जवळ जवळ अडीच वर्षांनी मोठ्या असणाऱ्या भावाला अपारशक्ति आयुष दादा म्हणून हाक मारतो. तर तुम्हाला माहीत आहे का की, आयुष्मान सारखा स्वीट बॉय असणारा हिरो हा घरात कोणा शिक्षकापेक्षा कमी नाही आहे. याच विस्लेशन हे खुद्द अपारशक्ति ने केलं आहे तो सांगतो की, भैय्या चे वागणे घरात इतके कडक आहे की, मी कधी झोपतो आणि कधी उठतो यावर ही त्याची नेहमीच नजर असतें.
इतकचं नाही तर आयुष्मान भैय्या कधी रात्री उशिरा पार्टी ला जात नाहीत आणि मला ही जाऊन देत नाहीत. तो आयुष्मान बद्दल बोलत असताना हे ही सांगतो की, आमचे भैय्या इतके कामात व्यस्त असूनही परिवारातील प्रत्येक व्यक्तीचा आवर्जून विचारपूस करतात. आणि सगळ्यांना त्यांच्या कामाची आठवण करून देतात. मी त्यांचा छोटा भाऊ असूनही मला ते नेहमीच सगळ्या गोष्टींची आठवण करून देत असतात.

तुझा उद्या शुट्टींग आहे शिवाय कधी प्रमोशन असेल तर त्याबद्दल आठवण करून देतात. मी आणि भैय्या तासनतास आम्ही एकमेकांबद्दल गप्पा मारत बसतो. आम्ही जास्त करून घरीच गप्पा मारत असतो बाहेर जास्त जात नाही. लहानपणा पासूनच भैय्या ला शिकण्यात आणि खेळात खूप जास्त इंटरेस्ट होता. खासकरून ज्युनिअर क्लास मधील मुली त्यांना हा इतका आवडायचा की, त्या त्यासाठी माझ्याशी मैत्री करायच्या. अपारशक्ति ला ही त्याच्या सिनेमासाठी भरपूर अवॉर्ड मिळाले आहेत.