Home करमणूक ह्या बिझनेसमननी ह्या बॉलीवुड अभिनेत्रींसोबत केलं लग्न

ह्या बिझनेसमननी ह्या बॉलीवुड अभिनेत्रींसोबत केलं लग्न

by Patiljee
104 views

बॉलिवुड मधील सुंदर अप्सरा या दिसायला जरी सुंदर असल्या तरी त्यांचे ही आपल्या जीवनसाथी विषयी मत आहे. आपल्या आयुष्यातील जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. म्हणून काही अभिनेत्री या आयुष्यभर या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्या तरीही त्यांनी आपल्या जीवनाचा जोडीदार हा कोणी हिरो नाही केला तर मोठमोठ्या बिझिनेस मन सोबत लग्न केले आहे. आणि आज आपण हेच पाहणार आहोत की त्या अभिनेत्री नेमक्या कोणत्या आहेत.

सोनम कपूर अहूजा आणि आनंद आहूजा
सोनम कपूर बॉलिवुड मधील ओळखली जाणारी अभिनेत्री अनिल कपूर ह्यांची कन्या आहे. पण तिने कोणत्याही अभिनेता सोबत लग्न केले नाही तर एक मोठा बिझनेस मन आनंद आहूजा सोबत मोठ्या थाटामाटात लग्न केलं. या दोघांचं लग्न पंजाबी रीतिरिवाज प्रमाणे झाले होते.

शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि राज कुंद्रा
शिल्पा शेट्टी कितीही वय झाले तरी अजूनही तरुण वाटणारी ही अभिनेत्री मुळात आपल्या फिटनेस बद्दल खूपच जागरूक असते. आणि हेच तिच्या सुंदरतेचे रहस्य आहे. या अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील जोडीदार हा कोणी अभिनेता नाही तर भारतामधील एक हुशार बिझिनेस मन राज कुंद्रा सोबत लग्न केले आहे.

जूही चावला आणि जय मेहता
जुही चावला हिने आपल्या काळात खूप सारे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिची अदाकारी कोणाला वेड नाही लावून गेली तर नवलच. तिनेही जय मेहता हा भारतातील एक मोठा बिझिनेस मन याच्यासोबत लग्न केले आहे. ह्या दोघांमध्ये वयामध्ये खूप अंतर आपल्याला पाहायला मिळते.

ईशा देओल आणि भरत तख्तानी
ईशा देओल ही धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी पण बॉलिवुड मध्ये ती काही जास्त मुरली नाही. खर तर ती प्रेक्षकांवर आपला जादू नाही दाखवू शकली. हिने ही 2012 का भरत तख्तानी या व्यावसायिक सोबत लव मॅरेज केले आहे.

प्रीति झिंटा आणि जीन गुडइनफ

प्रीती झिंटा हिने आपल्या आयुष्यात खूप जास्त चढ उतार सहन केले आहेत दिसायला गोरी पान आणि गालावर हसताना पाडणारी खाली अशी ही अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनात घर करून शेवटी तिने 2016 मध्ये जीन गुडइनफ या अमेरिकन बिजनेसमन सोबत लग्न केले.

अमृता अरोरा आणि शकील लदाक
मलाइका अरोरा हीची बहीण अमृता अरोरा हिने बॉलिवुड मध्ये अनेक चित्रपट केले पण त्यात तिला अजिबात यश आले नाही. तिला प्रेक्षकांनी पसंत केली नाही त्यानंतर तिने बिजनेसमन शकील लदाक सोबत 2009 ला लग्न केले.

रवीना टंडन आणि अनिल थडानी
अजूनही प्रेक्षकांच्या दिलाची धडकण असणारी ही अभिनेत्री आता आजी झाली आहे. तरीही अजुन तितकीच पहिल्यासारखी सुंदर दिसते आहे. तिचा दिलवाले हा चित्रपट कितीदा पहिला तरीही पहावसं वाटतो. हिने सुध्दा बिजनेसमन अनिल थडानी याच्यासोबत लग्न केले आहे.

आयशा टाकिया आणि फरहान आजमी
पहिल्या टारझन सिनेमातून आलेली ही अभिनेत्री दिसायला खूप सुंदर अशी होती पण त्यानंतर तिने चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली आणि आपल्या चेहऱ्याची वाट लाऊन घेतली तिने 2009 ला फरहान आजमी या बिझिनेस मन सोबत लग्न केले.

समीरा रेड्डी आणि अक्षय वरडे
समीरा रेड्डी ही अभिनेत्री दिसायला तशी सावली पण तिचा चेहरा आकर्षक आहे सध्या तिने त्या काळी भरपूर सिनेमे केले पण आता ती सिनेसृष्टीत दिसेनाशी झाली आहे. हिने अक्षय वरडे या बिझिनेस मन सोबत लग्न केले आहे.

टीना मुनीम आणि अनिल अंबानी
बॉलिवुड मधील ही अभिनेत्री हिने तिच्या काळी अनेक चित्रपट केले हिचे सौदर्य तर लाजवाब होते हिने ही 1991 मध्ये अनिल अंबानी या भारतातील मोठ्या बिजनेसमन सोबत लग्न केले.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल