Home संग्रह बघा या स्त्रीची झाली आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद तिला बघून तुम्हीही घाबरून जाणार

बघा या स्त्रीची झाली आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद तिला बघून तुम्हीही घाबरून जाणार

by Patiljee
292 views

या जगात अशी ही माणसे जन्माला आली आहेत ज्यांना सामान्य माणसापेक्षा एक वेगळे शरीर मिळाले आहे पण अशा माणसांना आपलीच लोक लाथडतात. त्यांना अनेक नावे देतात आपल्या मुलांना त्यांच्यापासून लांब ठेवतात खर तर खूप वाईट अशी वागणूक या लोकांना दिली जाते. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. आपल्यासारखेच ते ही माणूसच आहेत फक्त काही शारीरिक उणीवा मुळे त्यांच्या शरीरात हे बदल आपल्याला दिसतात.

अशीच एक गोष्ट आहे ती म्हणजे एका स्त्रीची. तिच्या हात आणि पायाची मिळून 31 बोटे आहेत. काही लोक तिला चेटकीण वैगरे बोलून त्रास द्यायचे. ओडिसाच्या गंजम जिल्ह्यात ही महिला राहते. पण खास गोष्ट अशी आहे की त्या महिलेचे नाव आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद झालेले आहे.

तिचे नाव नायक कुमारी आहे ती एक वायोरुद्ध स्त्री आहे. तिच्या हाताची आणि पायाची बोटे मोजली तर तिच्या हाताला एकूण 12 बोटे आहेत तर पायाला 19 बोटे आहेत आणि हे तिच्यातील खास गुणधर्म जाणून तिचे नाव गिनीज बुक मध्ये नोंदविण्यात आले आहे.

पाहिले तर या स्त्रीवर त्याच गावातील लोकांनी भरपूर अत्याचार केले आहेत. तिला हडळ म्हणून तिला या सामाजाचा हिस्सा नाही असे मानण्यात आले होते. शिवाय तीला गावातून हाकलून ही देण्यात आले होते.

लहान असताना तिच्या या आजारा मुळे तिला घरातील लोकांनी सोडले होते. तेव्हापासून ती एकटीच राहते आहे. कोणीही तिच्याही बोलत नाही. या रोगाला या आजाराला पॉलिडॅक्टिली असे म्हणतात. तसेच 5000 लोकांमधे एकाला हा आजार होत असतो. खर तर आता तिची गिनीज बुकात नोंद झाल्यामुळे कदाचित सरकारने तिच्याकडे लक्ष द्यावे हीच अपेक्षा आहे. तिला पेंशन मिळायला हवी त्यामुळे कदाचित तिचे जीवनमान तरी सुधारेल.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल