मुंबई: आपण आज रिक्षावाला सत्यवान गिते याच्याबद्दल बोलणार आहोत. तो मुंबईमधे आपली रिक्षा चालवतो आताच एक रिक्षा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे सत्यवान गीते हे नाव आहे या रिक्षा वाल्याचे त्याने आपल्या रिक्षामधे ज्या ज्या सोई ठेवल्या आहेत त्या प्रत्येक प्रवाशासाठी आवश्यक असतात. मुंबईमधील सत्यवान गीते रिक्षा तर चालवता पण याच रिक्षा मध्ये त्यांनी हाेम सिस्टम बसवले आहे. याचबरोबर त्यांनी हेही सांगितले आहे की असी होम सिस्टम वाली रिक्षा ही मुंबईमधे पहिलीच आहे.

ज्या सुविधा आपल्या घरात असतात त्या सुविधा या रिक्षा मध्ये आहेत. त्यामुळे या रिक्षाला होम सिस्टम वाली रिक्षा असे नाव पडलं आहे. सत्यवान गीते पुढे सांगतो की, माझ्या रिक्षा मध्ये स्मार्ट फोन चार्जिंग, हैंड वॉश, प्यूरीफाइड पानी या सुविधा आहेत रिक्षा मध्ये या सगळ्या सोयी लावल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर वॉश बेसिन, सुंदर रोपटी, पेपर टिशू, डेस्कटॉप मॉनिटर या ही गोष्टी रिक्षा मध्ये लावल्या गेल्या आहेत.

जर का वयस्कर प्रवासी असतील तर त्यांच्यासाठी एक किलोमीटर इतका प्रवास हा फ्री मध्ये दिला जातो याबद्दल सांगताना सत्यवान गीते म्हणतात की, वयस्कर लोकांची यावेळी कमाई बंद होते तसेच यावेळी त्यांच्याकडे बघण्यासाठी कोणीच नसते त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे.