बॉलिवुड मधील काही अभिनेत्री या वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. काही त्यांच्या झिरो फिगर बद्दल तर काही अप्रतिम सौंदर्य बद्दल अशा वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्री आपण पहिल्या आहेत पण यांच्या विरूद्ध जाऊन काही अभिनेत्री या आपल्या एक अनोख्या अशा गोष्टींबद्दल प्रसिद्ध आहेत ती म्हणजे बाईक चालवणे. तर मित्र मैत्रिणींनो या पाच अशा अभिनेत्री आहेत त्यांना सिनेमात नाही तर आपल्या खऱ्या आयुष्यात आवडते बाईक चालवायला.
प्रियंका चोपड़ा
प्रियांका चोपडा या बॉलिवुड अभिनेत्रीला बाईक चालवायला खूप आवडते. आता ती जशी आपल्या लग्न झालेल्या निक जोनास नवऱ्यासोबत सतत दिसत असली तरी कितीतरी ठिकाणी तिला बाईक चालवताना आणि बाईक वर बसून फोटो काढताना पाहिले गेले आहे.
करीना कपूर
करीना कपूर ही जशी बॉलिवुडमधील झीरो फिगर ची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे तिला बाईक चालवण्याच्या ही खूप वेड आहे. तिने 3 इडियट्स या सिनेमात तशी स्कूटी चालवली होती पण सिनेमा बाहेर तिला बाईक चालवायची खूप जास्त हौस आहे.
श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूर हिने आपला पाहिला सिनेमा तीन पत्ती मधून या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला असला तरी अशिकी 2 या सिनेमातून ती नावारूपाला आली आणि त्यानंतर तिने पाठीमागे पहिलेच नाही. श्रद्धा कपूर हिला ही बाइक चालवण्याची खूप आवड आहे तशी ती आशिकी 2 च्या सेट वर शूटिंग करताना बुलेट वरून पडली ही होती.
अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माचा सिनेमा रब ने बना दी जोडी या सिनेमात ती बाईक चालवताना आपल्याला दिसते. त्यात तिच्या पाठच्या सीटवर शाहरुख खान बसलेला आहे अशीच अनुष्का खऱ्या आयुष्यात ही बाईक अगदी आवडीने चालविते. विराट कोहली सोबत एकदातरी बाईकवर कुठे लांब फिरायला जावे अशी तिची मनापासून इच्छा आहे.
कॅटरिना कैफ
बॉलिवुड मधली नावाजलेली अभिनेत्री म्हणून कॅटरिना प्रसिद्ध तर आहेच पण ती खऱ्या आयुष्यात बाईक चालविण्याची आवड ठेवते हे तुम्हाला माहीत आहे का? हे खरं आहे मित्रानो. जेव्हा जेव्हा कॅटरिनाला वेळ मिळतो तेव्हा ती आवडीने बाईक चालविते.