आपल्या पाळण्यात ठेवलेले नाव हे आपल्या शेवटपर्यंत तसेच राहते पण हे बॉलिवुड मधील अभिनेते सुपरहिट होण्यासाठी आपले नाव ही बदलताना दिसतात. तर मित्रानो आज आपण त्या अभिनेत्या बद्दल बोलणार आहोत त्यांनी सुपरहिट सिनेमे तर दिलेच पण त्याचबरोबर आपली खरी नावे काय आहेत हे आपल्यापासून लपवून ठेवले आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत या हिट अभिनेत्याची खरी नावे काय आहेत ते.
टायगर श्रॉफ
टायगर श्रॉफ हा बॉलिवुड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. उत्कृष्ट बॉडी असणारा हा अभिनेता कितीतरी मुलींच्या हृदयात घर करून बसला आहे. या अभिनेत्याचे खरे नाव काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का तर ऐका याचे खरे नाव आहे हेमंत श्रॉफ.
जॉनी लिव्हर
जॉनी लिव्हर याने आजपर्यंत आपल्या सिनेमातून सर्व प्रेक्षकांना हसवून सोडले आहे. जॉनी लिव्हर म्हणजेच कॉमेडी चा बादशहा. त्याचे कोणत्याही सिनेमात असणे म्हणजे आपल्यासाठी हस्स्याची मेहफील असते. पण तुम्हाला आहे जॉनी ने आपले नाव बदलले आहे. त्याचे खरे नाव जॉन राव प्रकाश राव जनुमाला.
जॉन अब्राहम
बॉलीवूड मधील हा ऍक्शन हिरो दिसायला अत्यंत हँडसम, बॉडी बिल्डर. धूम सिनेमातून पदार्पण केल्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याचे वडील हे सिंधी तर आई पारशी समाजाची होती. त्यामुळे त्यांनी जॉन अब्राहम चे नाव फरहान अब्राहम हे पारशी नाव ठेवले होते.
गोविंदा
गोविंदा हा त्याच्या काळी सुपर हिट हिरो मानला जायचं. खूप सारे हिट सिनेमे देऊन त्याने लोकांच्या मनावर राज्य केले आहे. याचे पहिले नाव ही वेगळे आहे ते म्हणजे अरुण आहुजा.
मिथुन चक्रवर्ती
आपल्या काळात आपल्या डिस्को डान्स ने सर्व प्रेक्षकांना हेरून धरणारा हा अभिनेता मिथुन ह्यांनी शून्यातून आपले जग निर्माण केले होते. खूप मेहनत घेऊन आज या ठिकाणी त्याने आपले स्थान निश्चित केले आहे. यांचे नाव ही पाहिले गौरांग चक्रवर्ती असे होते.
अमिताभ बच्चन
बॉलिवुड तरुणपणात ही गाजवला आणि वृद्धपणातही अनेक चित्रपट करणारा हा महानायक आतापर्यंत सर्वांच्या दिलावर राज्य करत आहे. यांनी आपले नाव इंकलाब श्रीवास्तव हे बदलून अमिताभ बच्चन हे ठेवले आहे.