मित्रांनो तुमच्या आमच्या सारखा सामान्य व्यक्ती असो किंवा बॉलिवुडमधील कलाकार असो जसे आपल्यामध्ये भांडणे होत असतात तसेच या लोकांत सुध्दा काही कारणांवरून भांडणे होत असतात. काही भांडणे तर इथपर्यंत येतात की या अभिनेत्री एकमेकींच्या तोंड ही बघू शकतं नाहीत तर मग बघू या कोण आहेत या अभिनेत्री.
सनी लियोनी आणि राखी सावंत
सनी लिओनी हिने बॉलिवुड मध्ये पदार्पण केलेलं असले तरी तिच्या या कामामुळे राखी सावंत त्रस्त आहे. कारण तिच्या बॉलिवुड मध्ये येण्यामुळे राखी सावंतचा बॉलिवुड मध्ये मिळणारा भाव कमी झालाय. तिला आता काम ही पहिल्यासारखे मिळत नाही आणि म्हणून राखी आणि सनी या दोघींमध्ये नेहमीच वाद पेटलेला असतो आणि हा सगळा राग राखी कधी कधी मीडिया समोर काढत असते.
दीपिका आणि कतरिना
दोघीही बॉलिवुड मधील अगदी नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. यांना बघून तुम्हाला ही वाटणार नाही की या दोघींमध्ये भांडणे आहेत. या दोघींमध्ये भांडणाची ठिणगी तेव्हा पेटली जेव्हा दीपिका आणि रणबीर या दोघांचा ब्रेकअप झाला होता आणि या ब्रेकअपचे कारण दीपिका कतरिनाला ठरवले होते आणि त्या दिवसापासून या दोघी एकमेकींशी बोलत नाहीत.
रेखा आणि जया
रेखा आणि जया बच्चन यांच्या वादाला अमिताभ बच्चन कारणीभूत आहेत. हे आपल्या सर्वानाच माहित आहे आणि या गोष्टीसाठी कोणते कारण आहे हे ही तुम्हाला सांगायची गरज नाही आणि म्हणून रेखा आणि जया यांच्यातील वाद हा अजूनही पहिल्यासारखा आहे.
करिना कपूर खान आणि प्रियंका चोप्रा
चांगल्या मैत्री मध्ये कटुता निर्माण होण्यासाठी काहीतरी कारण पुरेसे असते तसेच करीना आणि प्रियंका या दोघींचे आहे. या दोघींचा एक चित्रपट आला होता त्यात करीना ही प्रमुख भूमिकेत होती. शिवाय प्रियांका हिने खलनायिका म्हणून काम केले होते. पण या चित्रपट मध्ये करीना ऐवजी जास्त प्रशंसा ही प्रियांकाच्या भूमिकेची केली जात होती आणि म्हणून या दोघींमध्ये यावरून वाद आहेत. शिवाय त्यानंतर या दोघींनी एकत्र कामही केले नाही.