मित्रांनो हे जरी साऊथ सिनेमातील अभिनेता असले तरी आपल्याकडील असंख्य लोक यांचे चांगलेच फॅन आहेत. त्यांच्या चित्रपटातील ऍक्शन आणि फॅमिली ड्रामा आपल्याला हे चित्रपट पाहायला भाग पाडतात या चित्रपटात अभिनेते आपल्या सर्वानाच आवडतात पण त्यांच्या रिअल जोडी दारा बद्दल बहुतेक कमी लोकांना माहिती असेल तर आज आपण पाहणार आहोत या सुपरहिट अशा अभिनेत्याची खरी खुरी बायको कशी दिसते.
जूनियर एनटीआर
ज्युनिअर एनटीआर साऊथ सिनेमातील एक सुपरस्टार म्हणून याची ओळख आहे त्याची बॉडी आणि एक्शन पाहून कोण नाही त्याचा फॅन होणार, याने आपला सिनेमातील पहिलं पाऊल 1991 मध्ये बालकलाकार म्हणून ब्रह्मर्शी विश्वामित्र या सिनेमातून ठेवला होत. जूनियर एनटीआर हे नाव त्यांना प्रेक्षकांनी ठेवले आहे त्यांच्या पहिल्या सिनेमा नंतर, पण त्यांचे खरे नाव आहे “नंदमूरी तारक रामा राव”.जूनियर एनटीआर याचे लग्न 2011 ला लक्ष्मी हीच्यासोबत झाले. तेव्हा लक्ष्मी चे वय केवळ 18 वर्ष होते. लक्ष्मी चे वडील तेलगू न्यूज चॅनल चे मालक आहेत.

सूर्या
साऊथ चित्रपट मधील अत्यंत देखणा आणि स्मार्ट असा अभिनेता आहे. त्याची पत्नी जोतिका ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे जी साऊथ मधेच चित्रपटात काम करते. तिने आपल्या चित्रपटाची सुरुवात जरी बॉलिवुड मधून केली असली तरी आता तो साऊथ मधील एक हॉट अभिनेत्री आहे. त्या दोघांचं लग्न 2006 साली झाले. या दोघांचे ही एकमेकांसोबत अनेक चित्रपट निघाले आहेत. सूर्या यांना चित्रपटात काम करायची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे पाहिले तर त्याने कपड्याच्या एका फॅक्टरी मध्ये काम केले आहे. ते 20 वर्षाचे असताना त्यांना एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि इथून त्यांच्या करिअर ला सुरुवात झाली.

अल्लू अर्जुन
अल्लू अर्जुन या अभिनेत्याचे नाव प्रत्येक चाहत्यांच्या तोंडावर आपल्याला ऐकायला मिळते. याचे लग्न एक इंजिनिअर मास्टर डिग्री केलेल्या मुलीसोबत म्हणजे स्नेहा रेड्डी हिच्यासोबत झाले आहे. 6 मार्च 2011 रोजी या दोघांचं लग्न पार पडले. अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांच्या पाहिले मैत्री होती त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडली. आता त्यांना दोन मुलेही आहेत.

रामचरण तेजा
रामचरण तेजा हा साऊथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता आहे हे तुम्हाला माहीतच आहे. 2007 मध्ये त्याने चिरुथा या सिनेमातून या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. एक डान्सर, प्रोडूसर आणि बिजनेसमन अशी त्याची ख्याती आहे. 14 जून 2012 ला या अभिनेत्याने उपासना हिच्यासोबत लग्न केले ती दिसायला कोण्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही.

महेश बाबू
महेश बाबू साऊथ सिनेमातील गूड लूकिंग असा अभिनेता याने नम्रता शिरोडकर हिच्यासोबत लग्न केले. यांचे प्रेम प्रकरण तब्बल 4 वर्ष चालू होते त्यानंतर दोघांनी 10 फेब्रुवारी 2005 ल दोघांनी लग्न केले. नम्रता होणे हिंदी तेलगू मल्याळम तसेच मराठी मध्येही काम केले आहे. आता मात्र ती आपल्याला या सिनेसृष्टीतून गायब झालेली दिसते.

ह्या पाचही अभिनेत्यांपैकी तुम्हाला कोण जास्त आवडते आम्हाला कमेंट करून सांगा.